वर्ल्ड पिकलबॉल लीगची सुरुवात होत असून 2025 च्या सुरुवातीला याचा पहिला हंगाम खेळला जाईल. दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा हिने चेन्नई फ्रेंचायझीमध्ये गुंतवणूक केली आहे. पण हा खेळ नक्की आहे तरी काय याची माहिती माजी टेनिसपटू आणि वर्ल्ड पिकलबॉल लीगचे फाऊंडर गौरव नाटेकर यांनी दिली.