पश्चिम रेल्वेच्या दहिसर स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असताना गेल्या दीड वर्षापासून फलाट क्रमांक 1 च्या एका कोपऱ्यात शौचालय अर्धवट ठेवल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
नियमानुसार प्रवाशांना मानवी हक्कांच्या आवश्यक सुविधा देणे बंधनकारक असतानाही प्रशासन सुविधा देण्याकडे का दुर्लक्ष करत आहे असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे. प्लॅटफॉर्म क्र. 1 वर शौचालय बंद असल्याने आजारी, वृद्ध व सामान्य माणसांना प्लॅटफॉर्म क्र. 4 वर दूर असणाऱ्या शौचालयात वळसा घालून जावे लागते. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्र. 1 वरील शौचालय तातडीने सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे पश्चिम रेल्वे उपाध्यक्ष – सामाजिक कार्यकर्ता राजेश पंडय़ा यांनी प्रवाशांच्या वतीने केली आहे.