लोकलमध्ये मोठ्या आवाजात व्हिडीओ बघणे महागात पडणार, पश्चिम रेल्वेची लवकरच नवीन नियमावली

लोकल प्रवासात मोबाईलकर मोठय़ा आकाजात गाणी ऐकणे आणि व्हिडीओ बघणे प्रकाशांना महागात पडणार आहे. मोबाईलवर व्हिडीओ लावून इतरांना त्रास देणाऱया प्रवाशांवर कारवाई करण्याचा विचार पश्चिम रेल्वे प्रशासन करीत आहे. याबाबत लवकरच नवीन नियमावली तयार केली जाणार आहे.

लोकलमध्ये अनेक प्रकासी मोठय़ा आवाजात गाणी व व्हिडीओ ऐकतात. जे प्रकासी तास-दीड तासाचा प्रकास करतात त्यांना प्रवासात शांती हवी असते. मात्र व्हिडीओ आणि मोठ्या आवाजातील गाण्यांचा त्रास त्यांना सहन करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने लोकलमध्ये मोबाईलवर व्हिडीओ ऐकण्यास बंदी घालावी, अशी मागणी अनेक प्रवाशांनी केली आहे. त्या मागणीची दखल घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासन लोकलमध्ये मोबाईलवर इयरफोनशिवाय गाणी आणि व्हिडीओ ऐकण्यास मनाई करण्याच्या विचारात आहे. सुरुवातीला प्रवाशांना ताकीद दिली जाणार आहे. त्यानंतरही प्रवाशांच्या वर्तणुकीत बदल दिसून आला नाही तर प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

अनाऊन्समेंटद्वारे जनजागृती करणार

प्रवाशांना लोकल प्रवासात इयरफोनशिवाय गाणी व व्हिडीओ ऐकू नये, असे आवाहन लोकल ट्रेन आणि रेल्वे स्टेशनवर अनाऊन्समेंटद्वारे केले जाणार आहे. मुंबईतील बेस्ट बसमध्ये मोबाईलवर गाणी आणि व्हिडीओ मोठ्या आवाजात ऐकण्यास मनाई केली आहे. त्याच धर्तीवर नियमावली लागू करण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार आहे.