
पश्चिम रेल्वेने आपले सर्व विभाग आणि आस्थापना ‘भंगारमुक्त’ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या विशेष मोहिमेंतर्गत प्रशासनाने 2024-25 या आर्थिक वर्षात भंगार विकून तब्बल 507.78 कोटी रुपये कमावले आहेत. रेल्वे मार्ग तसेच रेल्वे स्थानकांच्या आवारात असलेल्या भंगाराचा अडसर दूर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ‘मिशन झीरो व्रॅप’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम रेल्वेच्या कमाईच्या दृष्टीने पथ्यावर पडली आहे.