Mumbai Local: पश्चिम रेल्वेच्या 150 ते 175 लोकल रद्द; चाकरमान्यांचे होणार हाल

पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या विस्ताराचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. दरम्यान हे काम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून त्यापैंकी 128 तासांचं काम बाकी आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून 4 ऑक्टोबरपर्यंत 150 ते 175 लोकल रद्द होणार आहेत. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवासांचे हाल होणार आहेत.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राम मंदिर स्टेशन ते मालाड दरम्यान 30 किमी प्रतितास वेगानं लोकल चालवल्या जातील. यामुळे चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेने केलेल्या नियोजनानुसार सहावी लाईन डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अनेक लोकल रद्द, तर काही लोकलच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली स्टेशन दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, सोमवारी रात्री 12.30 वाजता ते मंगळवारी पहाटे 4.30 वाजतेपर्यंत चार तासांचा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार या कालावधीत लोकल चर्चगेट ते अंधेरी आणि विरार ते बोरिवली पर्यंत चालवल्या जातील.