पश्चिम रेल्वे मार्गावर होणारी वाढती गर्दी लक्षात घेता या मार्गावर 12 डब्यांच्या 10 गाड्यांचे रुपांतर 15 डब्यांत करणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून हा बदल होणार आहे.
पश्चिम मार्गावरील प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी असते. त्यामुळे लोकल पकडताना प्रचंड रेटारेटी करतच डब्यात घुसावे लागते. याची दखल घेत पश्चिम रेल्वेने येत्या 1 तारखेपासून 12 डब्यांच्या 10 गाड्यांचे रुपांतर 15 डब्यांत करण्याचे ठरवले आहे. यामुळे 12 अतिरिक्त फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. आता 15 डब्यांच्या एकूण 209 फेऱ्या होणार आहेत. या लोकल अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेला धावणार असून, या वाढीव फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांची संख्या 1394 वरून आता 1406 होईल.