कही धुप कही छाव, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राला अवकाळीचा इशारा; मुंबई तापणार

फोटो - रुपेश जाधव

कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा, मुंबईसाठी दिला इशारा

कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा इशारा मुंबई वेधशाळेने दिला आहे. तसेच मुंबईबाबतही महत्वाचा अंदाज वर्तवला आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

तसेच पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी आकाश निरभ्र राहील. उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 अंश सेल्सियस आणि 25 अंश सेल्सियच्या आसपास राहिल.


तसेच कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे.