ममतादीदींचे ‘खेला होबे’; भाजपला मोठा झटका

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जादू कायम असून,  ‘खेला होबे’चा नारा आणखी बुलंद झाला आहे. भाजपला मोठा झटका बसला आहे.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. 2019च्या निवडणुकीत भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी तब्बल आठ जागा भाजपने गमावल्या असून, केवळ 10 जागांवर विजय मिळविला आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा धुराळा उडवला होता. मात्र, जनतेने भाजपला जागा दाखवली. 2019 ला 22 जागांवर विजय मिळवणाऱया तृणमूल काँग्रेसच्या पारडय़ात यावेळी जनतेने भरभरून मते टाकली. तृणमूलला 31 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले. माकपला यावेळीही खाते उघडता आले नाही.

फोडाफोडी, पेंद्रीय तपास यंत्रणेच्या गैरवापराला प्रत्युत्तर

भाजपने इतर राज्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही फोडाफोडीचे राजकारण आणि तृणमूल काँग्रेसविरुद्ध ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचा गैरवापर केला. मात्र, पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला जोरदार प्रत्युत्तर देताना अनेक उमेदवारांना पराभवाची धूळ चारली.

पक्ष        जागा

तृणमूल    31

भाजप     10

काँग्रेस     01

एकूण      42

राजस्थानात काँग्रेसची जोरदार एन्ट्री

काँग्रेस पक्षाने राजस्थानात जोरदार एन्ट्री करताना भाजपला झटका दिला. लोकसभेच्या 25 जागांपैकी 8 जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. राजस्थानात काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आली. 2019ला लोकसभेच्या सर्व 25 जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र या वेळी काँग्रेसने भाजपला जोरदार दणका दिला. काँग्रेसने आठ आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी तीन असा 11 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपला 14 जागा मिळाल्या. मात्र गेल्या वेळीपेक्षा 11 जागांचे नुकसान आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोटामधून विजयी झाले.

अधिर रंजन चौधरी पराभूत; युसूफ पठाण विजयी

काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांचा बहरामपूर मतदारसंघात पराभव झाला आहे. तृणमूलचे उमेदवार क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी 82 हजार मतांनी त्यांचा पराभव केला. अधिर रंजन चौधरी यांनी सहावेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

अभिषेक बॅनर्जी, शत्रुघ्न सिन्हा, मोईत्रा यांचा विजय

तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी हे डायमंड हर्बर मतदारसंघातून साडेतीन लाखांवर मतांनी विजयी झाले असून, भाजपचे अभिजित दास यांचा त्यांनी पराभव केला आहे. असनसोल मतदारसंघात ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप नेते एस. एस. अहुवालिया यांचा पराभव केला. तृणमूल नेत्या महुआ मोईत्रा कृष्णानगर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.

ओडिशात भाजपची सत्ता; 24 वर्षांनंतर पटनायक पराभूत

ओडिशात 24 वर्षांपासून सत्तेत असलेले नवीन पटनायक यांनी सत्तेची सूत्रे गमावली आहेत. 147 पैकी 80 जागांवर भाजपने आघाडी घेतल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी सत्तापालटाची चाहूल घेत लाडूवाटपाला प्रारंभ केला होता. एक्झिट पोलमध्ये बीजेडी आणि भाजप यांच्यात चुरशीची स्पर्धा दिसून आली होती. दोन्ही पक्षांना प्रत्येकी 62 ते 80 जागा मिळतील असा अंदाज या पाहणीत व्यक्त करण्यात आला होता.

आंध्रमध्ये चंद्राबाबूंचे कमबॅक

आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसला लोकांनी नाकारले असून, एनडीए (भाजप, टीडीपी आणि जनसेना पक्ष) यांना 162 जागांची आघाडी देत सरकार स्थापनेसाठी काwल दिला आहे. सध्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी राजीनामा दिला असून, चंद्राबाबू तेलगु देसमचा झेंडा घेऊन मुख्यमंत्रीपदी पुनरागमन करतील अशी शक्यता आहे.