मुस्लीम समाजाविरोधात बेताल विधान करणाऱ्या भाजप आमदाराविरोधात निषेधाचा ठराव

पश्चिम बंगालचे भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी मुस्लीम समाजाविरोधात वादग्रस्त विधान केले होते. पश्चिम बंगालच्या विधीमंडळाने अधिकारी यांच्याविरोधात निषेधाचा ठराव मांडला आहे. उद्या बंगालमध्ये भाजप सत्तेत आली तर तृणमूल काँग्रेसच्या सर्व मुस्लीम आमदारांना विधीमंडळाबाहेर काढू अशी धमकी दिली होती.

11मार्च 2025 रोजी सुवेंदू अधिकारी यांनी अल्पसंख्यांक समाज आणि विरोधी पक्षनेत्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं, यामुळे संविधानि पदाचा आणि संविधानाचा अपमान झाल्याचे या ठरावात म्हटले आहे. अधिकारी यांच्या विधानामुळे अल्पसंख्या समाजात घबराट निर्माण झाली असून रमदान सारख्या पवित्र महिन्यात मुस्लीम भिती निर्माण झाल्याचे ठरावात म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. भाजपचं हिंदुत्व खोटं असून, भाजप देशात फक्त द्वेष पसरवत आहे असे बॅनर्जी म्हणाले.