पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील पुराबाबत पत्र लिहिले आहे. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (DVC) सोबत असलेल्या वादावर पुनरुच्चार करताना, त्यांनी सांगितलं की दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने सुमारे 5 लाख क्युसेक पाणी अनियोजितरितीने सोडले, ज्यामुळे दक्षिण बंगाल जिल्ह्यांमध्ये पूर आला.
पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात ममता बॅनर्जी यांनी केंद्राला तात्काळ निधी देण्याची विनंती केली. पुरामुळे राज्यात मोठा विध्वंस झाला तो कमी करण्यासाठी केंद्रीय निधी त्वरित जारी करण्यास या पत्रात सांगितलं आहे.
‘2009 नंतर लोअर दामोदर आणि लगतच्या भागात सर्वात जास्त पुराचा सामना करत आहे. मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की तुम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करा आणि संबंधित मंत्रालयांना या समस्यांना सर्वोच्च प्राधान्य म्हणून सोडवण्याचे निर्देश द्या, यामध्ये भरीव केंद्रीय निधी मंजूर करणे आणि तो निधी पोहोचवणे याचा समावेश आहे. ज्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो, त्यांच्या हितासाठी व्यापक पूर व्यवस्थापनाची कामे हाती घेणे आवश्यक आहे’, असं या पत्रात लिहिले आहे.
ममता यांनी आरोप केला की ‘डीव्हीसीच्या मालकीच्या आणि देखभाली अंतर्गत असलेल्या मैथॉन आणि पानशेत धरणांतून सुमारे 5 लाख क्युसेकने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग ‘अनयोजितरितेने आणि एकतर्फी निर्णयातून सोडला’ यामुळे बंगालमध्ये पूर आला.
गुरुवारी, ममता बॅनर्जी यांनी झारखंड सरकारवर टीका केली आणि तीन दिवसांसाठी आंतरराज्य सीमा सील करण्याचे आदेश दिले.