बीएसएफ बांगलादेशातील दहशतवाद्यांना बंगालमध्ये घुसू देत आहेत, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

केंद्र सरकारकडून पश्चिम बंगाल अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. सीमा सुरक्षा बल बांगलादेशहून येणाऱ्या दहशतवाद्यांना बंगालमध्ये घुसून देत आहे असेही बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी राज्यात दहशतवादी कारवायांबद्दल केंद्र सरकारला दोषी ठरवले आहे. यासाठी केंद्र सरकार आणि बीएसएफ जबाबदार असल्याचे बॅनर्जी यांनी ठरवले आहे. दोन जानेवारी बॅनर्जी यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे आरोप केले.

या बैठकीत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बीएसएफ बंगालमध्ये वेगवेगळ्या भागातून घुसखोरी करत आहेत. इतकंच नाही तर बीएसएफकडून महिलांवर अत्याचारसुद्धा होत आहे. मी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करायला सांगितले आहे, कारण सीमी सुरक्षा आमच्या हाथी नाही. जर कोणी तृणमूल काँग्रेसवर घुसखोरीचे आरोप करत असेल तर त्यांना मी सांगू इच्छिते की सीमा भाग हा बीएसएफच्या अखत्यारित येतो. त्यासाठी घुसखोरीसंदर्भात आमच्यावर आरोप करू नये असे बॅनर्जी म्हणाल्या.