सीमा सुरक्षा दल बांगलादेशींची घुसखोरी करतेय

बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दल बांगलादेशींना घुसखोरीसाठी मदत करत असून बंगालमध्ये जाणीवपूर्वक अशांतता पसरवण्याचे काम केले जात आहे. मोदी सरकारचा हाच अजेंडा आहे, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. बीएसएफ अशा कारवायांना प्रोत्साहन देत राहिल्यास तृणमूल काँग्रेस त्यांचा कडाडून निषेध करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफ सीमेवर तैनात आहे, परंतु बांगलादेशींना इस्लामपूर, सीताई आणि चोपडा सीमेवरून हिंदुस्थानात येण्याची परवानगी देण्यात येत आहे. बीएसएफ महिलांवरही अत्याचार करत असल्याचा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला. या ठिकाणी राज्यात अशांतता पसरवण्यासाठी मोठे षडयंत्र रचले जात असून त्यात पेंद्र सरकारही सामील आहे असा आरोपही त्यांनी केला.