
कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका नौदल अधिकाऱ्याचाही समावेश आहे. लेफ्टनंट विनय नरवाल यांचे हिमांशी नरवालशी लग्न झाले होते आणि ते हनिमूनसाठी काश्मीरला गेले होते. खरंतर विनय यांचा प्लॅन हा युरोपला हनिमूनसाठी जाण्याचा होता. परंतु युरोप व्हिसा न मिळाल्यामुळे, प्लॅन बदलावा लागला आणि ते दोघे हनिमूनसाठी कश्मीरला गेले.
लेफ्टनंट विनय नरवाल वय वर्ष अवघे 26.. आठ दिवसांपूर्वीच हिमांशी नरवालशी लग्न झाले होते. या जोडप्याला हनिमूनसाठी युरोपला जायचे होते परंतु त्यांना व्हिसा मिळू शकला नाही आणि त्यामुळे त्यांना हा प्लॅन रद्द करावा लागला. विनय हा हरियाणातील कर्नालचा रहिवासी आहे. त्याचे कुटुंब हरियाणातील कर्नाल येथील सेक्टर 7 येथे राहते. दहशतवाद्यांनी हिमांशीसमोर विनयवर गोळ्या झाडल्या. हिमांशीला मात्र दहशतवाद्यांनी काहीही केले नाही.
Pahalgam Terror Attack- आई मी कश्मीरवरुन आल्यावर तुला भेटायला येईन, नीरजचं ते अखेरचं बोलणं ठरलं…
विनय आणि हिमांशी 21 एप्रिलला कश्मीरला पोहोचले. 22 एप्रिलला त्यांनी पहलगाममधील एका हॉटेलमध्ये चेक इन केले. हिमांशी नरवालचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, यात तिने सांगितले की, ती आणि विनय पहलगामजवळील मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या बैसरन व्हॅलीला भेट देण्यासाठी गेले होते. त्यानंतर दहशतवादी आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. व्हिडिओमध्ये हिमांशी म्हणत असल्याचे दिसत आहे की, ‘मी माझ्या पतीसोबत भेळपुरी खात असताना एक माणूस आला आणि विनयकडे बोट दाखवत म्हणाला – तो मुस्लिम नाही आणि मग त्याने गोळी झाडली.’ विनय नरवाल हा अभियांत्रिकी पदवीधर होता आणि तो फक्त तीन वर्षांपूर्वीच नौदलात सामील झाला होता.