साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 29 सप्टेंबर ते शनिवार 5 ऑक्टोबर 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रकृतीची काळजी घ्या

मंगळ, शनि त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र लाभयोग. कठीण प्रसंगावर मात करून काम करावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्या. शत्रूवर नजर ठेवा. नोकरीच्या कामात मनस्ताप होईल. धंद्यात अरेरावी चालणार नाही. नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचेच मुद्दे घेऊन तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होईल. स्पर्धा कठीण आहे.

शुभ दिनांकः 29, 4

वृषभ – कामात यश मिळेल

सूर्य, बुध युती, चंद्र, गुरू युती. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करा. सार्वजनिक कामात लोकांना दुखवू नका. मैत्रीत, नात्यात गैरसमज, तणाव जाणवेल. नोकरीधंद्यात बुद्धिचातुर्याने प्रगती होईल. नवीन व्यवहार करताना काळजी घ्या. दिग्गज व्यक्तींचे सहकार्य राजकीय, सामाजिक क्षेत्रात मिळेल. वरिष्ठ आश्वासन देतील. कायदेशीर कामात यश मिळेल.

शुभ दिनांकः 29, 3

मिथुन – कायदा पाळा

सूर्य, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग. जवळच्या व्यक्तीचा सल्ला जास्त उपयुक्त ठरेल. अरेरावी, तणाव वाढवणारे प्रसंग क्षुल्लक असले तरी कायदा पाळा. नोकरीच्या कामात तत्परता दाखवा. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न होईल. शब्द जपून वापरा. आर्थिक व्यवहारात कागदपत्रे नीट ठेवा.

शुभ दिनांकः 29, 3

कर्क – प्रत्येक दिवस यशाचा

सूर्य, बुध युती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. जवळच्या श्राद्धपक्षाचे पालन करणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आठवणी जतन करणे. प्रत्येक दिवस यशाचा ठरेल. नोकरीधंद्यात जम बसेल. कर्जाचे काम मार्गी लावता येईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रेरणादायक घटना घडतील. योजनांना गती देता येईल. कला, क्रीडा, साहित्यात चालना मिळेल.

शुभ दिनांकः 29, 3

सिंह – कार्याला झळाळी मिळेल

सूर्य, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग. पूवर्जांच्या आठवणीने कार्याला झळाळी मिळेल. नवरात्रौत्सवातून प्रेरणा, प्रतिष्ठा मिळेल. कुलदेवीच्या आशीर्वादाने प्रगतीचा नवा मार्ग शोधता येईल. नोकरीधंद्यात उत्कर्ष होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. अनेक दिग्गजांचा परिचय होईल. ज्ञानात भर पडेल.

शुभ दिनांकः 3, 4

कन्या – सुखद समाचार मिळतील

सूर्य, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग. अनेक प्रश्न मार्गी लावता येतील. घरात सुखद समाचार मिळतील. नवरात्रौत्सवात कुलदेवीची आराधना एकाग्र मनाने कराल. नोकरीधंद्यात प्रगतीची आशा जाणवेल. कठीण प्रसंगांवर मात करून नव्या आत्मविश्वासाने प्रगती कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ओळख वाढेल. खरेदीविक्रीत लाभ होईल.

शुभ दिनांकः 3, 5

तूळ – समतोल राखा

मंगळ, शनि त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र युती. क्षेत्र कोणतेही असो संयम, सहनशीलता, समतोल राखणे महत्त्वाचे आहे. भावनेच्या आहारी जाऊन, संतापाने कोणताही निर्णय ठरवू नका. नोकरीच्या कामात चूक होईल. धंद्यात नुकसान, आळस नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नम्रता ठेवा. कोणतेही विधान करण्याची घाई नको. वरिष्ठांना दुखवू नका. सावध रहा.

शुभ दिनांकः 29, 4

वृश्चिक – कर्तव्य पूर्ण करा

सूर्य, बुध युती, शुक्र शनि त्रिकोणयोग. पितृपक्ष पाळणे म्हणजे पूर्वजांचे स्मरण करणे. नवरात्रोत्सवात कुलदेवतेची आराधना फलद्रूप होईल. भावनेच्या आहारी न जाता कर्तव्य पूर्ण करा. नोकरीधंद्यात प्रयत्नांनी मोठे यश मिळवा. नवीन संधी, लाभ, कर्ज मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक महत्त्वाचे मुद्दे तयार करून सन्मान वाढवाल.

शुभ दिनांकः 29, 3

धनु – योग्य सल्ला घ्या

सूर्य, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग. अनेक समस्या मार्गी लावता येतील. योग्य सल्ल्याचा उपयोग करा. नविन परिचय उत्साह, आत्मविश्वास वाढवणारे ठरतील. नोकरीधंद्यात बुद्धिचातुर्याचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव, गैरसमज दूर करण्याची संधी सोडू नका. कार्यावर भर द्या. श्री कुलदेवीच्या कृपेने उत्साह टिकवता येईल.

शुभ दिनांकः 29, 3

मकर – प्रेरणादायी वातावरण

सूर्य, बुध युती, शुक्र, शनि त्रिकोणयोग. साडेसातीचे पर्व सुरू असले तरी तुमच्या क्षेत्रात प्रगतीची चांगली संधी मिळेल. विरोधकांना नमवता येईल. नवरात्र उत्सवात प्रेरणादायक वातावरण राहील. नोकरीधंद्याला नवे वळण मिळेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा परिचय लाभेल. लोकप्रियता वाढेल.

शुभ दिनांकः 3, 4

कुंभ – अहंकार दूर ठेवा

चंद्र, शुक्र लाभयोग, मंगळ, शनि त्रिकोणयोग. तुम्ही ठरवलेला कार्यक्रम अचानक बदलण्याची शक्यता. प्रतिष्ठेचा, अहंकाराचा प्रश्न निर्माण करू नका. कायद्याच्या कचाटय़ात अडकू नका. दूरदृष्टिकोन ठेवा. जवळच्या व्यक्ती सहाय्य करतील. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीधंद्यात घाई नको. व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया होतील.

शुभ दिनांकः 29, 3

मीन – गैरसमज होतील

सूर्य, बुध युती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. अचानक जवळच्या व्यक्ती तुमच्या विरोधात बोलतील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीधंद्यात जम बसवा. भावनेच्या आहारी जाऊ नका. नविन परिचय तपासून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी भाष्य कराल. वरिष्ठांना मदत कराल. योग्य मुद्दे तयार कराल. मैत्रीत गैरसमज होतील. प्रगती कराल.

शुभ दिनांकः  3