साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 ऑक्टोबर ते शनिवार 02 नोव्हेंबर 2024

>> नीलिमा प्रधान

मेषप्रकृतीची काळजी घ्या

मेषेच्या अष्टमेषात बुध, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. दिव्यांच्या तेजाने आयुष्य उजळून निघेल. जवळच्या व्यक्ती हेवेदावे करतील. प्रकृतीची काळजी घेणे म्हणजे हार नव्हे. व्यवहारात दक्षता बाळगा. नोकरीच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल परंतु स्पर्धाही वाढेल. धंद्याला व्यापक स्वरूप देताना घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिचय वाढतील.

शुभ दि. 28, 1

वृषभनोकरीत दगदग होईल

वृषभेच्या सप्तमेषात बुध, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. दिवाळीच्या अनेक शुभेच्छा घेऊन कार्यारंभ करा. कायदा पाळा. नम्रता ठेवा म्हणजे प्रश्न वाढणार नाही. वरिष्ठांचा मान ठेवा. नोकरीत दगदग होईल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा. नवीन ओळखी उत्साहवर्धक ठरतील. कौटुंबिक आनंद वाढेल. वाद वाढवू नका.

शुभ दि. 28, 29

मिथुनव्यवहारात फसगत टाळा

मिथुनेच्या षष्ठेषात बुध, मंगळ, नेपच्यून त्रिकोणयोग. धार्मिक प्रथेनुसार दीपावली साजरी करावी. दिव्यांच्या प्रकाशात मनावरील अंधकाराचे पटल दूर सारा. नोकरीच्या कामात प्रभाव राहील. मैत्रीत सावध रहा. व्यवहारात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान, प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. मोह, व्यसन मात्र टाळा.

शुभ दि. 1, 2

कर्कप्रत्येक दिवस उत्साहाचा

कर्केच्या पंचमेषात बंध, चंद्र, शुक्र लाभयोग. प्रत्येक दिवस उत्साहाचा, आनंदाचा ठरेल. दिवाळीच्या सणाने, दिव्यांच्या तेजाने प्रेरणादायक घटना घडतील. शुभसंकेत मिळतील. नोकरी, बढती, परदेशवारी शक्य होईल. धंद्यात लाभ, वाढ होईल. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसंगावधान ठेवा. भावनांच्या प्रवाहात वाहू नका.

शुभ दि. 28, 31

सिंहप्रत्येक दिवस यशाचा

सिंहेच्या सुखस्थानात बुध, चंद्र, शनि प्रतियुती. प्रत्येक दिवस नव्या विचारांचा, यशाचा असेल. दिवाळी नविन दिशादर्शक, विचारांना, कार्याला चालना देणारी ठरेल. नोकरीत कारस्थान करणारे उघड होतील. प्रभाव वाढेल. धंद्यात लक्ष द्या. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढलेली पाहून शत्रू गुप्त कारवाया करतील.

शुभ दि. 1, 2

कन्या – नोकरीत बढती मिळेल

कन्येच्या पराक्रमात बुध, चंद्र, शुक्र लाभयोग. या वर्षीची दिपावली आनंदी, लाभदायक ठरेल. नोकरीत बढती मिळेल. धंद्यात सुधारणा होईल. नवे भागीदार मिळतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य दाखवून द्याल. उत्साह, आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वांना चकित कराल. पद, प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल.

शुभ दि. 1, 2

तूळ – व्यवहार पूर्ण होतील

तुळेच्या धनेषात बुध, चंद्र, शनि प्रतियुती. मनावरील दडपण कमी करण्यासाठी सणांची रचना असते. जुना व्यवहार पूर्ण होण्याची आशा वाढेल. घरात आनंदाची बातमी मिळेल. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात लाभ होईल. नुकसान टाळता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिलासा देणारा कालावधी. थोरामोठय़ांचे परिचय कलाटणी देणारे ठरतील.

शुभ दि. 1, 2

वृश्चिक – शुभेच्छा यशदायी

स्वराशीत बुध, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. संयम, नम्रता यांचा उपयोग करा. दिवाळीच्या शुभेच्छा यशदायी ठरतील. कायदा मोडू नका. नोकरीत क्षुल्लक समस्या येतील. वरिष्ठांना मदत करा. धंद्यात लाभ होतील. मात्र चुकीची वाट नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपाच्या अडचणी सतावतील. डावपेच जपून टाका.

शुभ दि. 28, 29

धनु – सावध भूमिका घ्या

धनुच्या व्ययेषात बुध, चंद्र, शनि प्रतियुती. उतावळेपणा नको. विचारपूर्वक डावपेच टाका. जवळच्या व्यक्तींना नाराज करू नका. दीपावलीच्या शुभेच्छांनी प्रत्येक दिवस यशस्वी करा. सावध भूमिका घ्यावी लागेल. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घालावा लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचारांचा कल बदलावा लागेल.

शुभ दि. 28, 1

मकर – अडचणी कमी होतील

मकरेच्या एकादशात बुध, चंद्र, शुक्र लाभयोग. दीपावलीच्या अनेक शुभेच्छा घेऊन तुमच्या क्षेत्रात प्रगतीची उच्च सीमारेषा पार करण्याचा प्रयत्न करा. मंगळवार पासून अडचणी कमी होतील. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. कठीण कामे पूर्ण करता येतील. नोकरीत उत्कर्ष होईल. धंद्यात वाढ होईल. प्रवासाचा आनंद घ्याल. प्रेरणादायी घटना घडतील.

शुभ दि. 1, 2

कुंभ – वादाला महत्त्व देऊ नका

कुंभेच्या दशमेषात बुध, चंद्र, शुक्र लाभयोग. दीपावलीच्या शुभेच्छा कठीण प्रश्न मार्गी लावण्यात मदत करतील. सण आनंदात साजरा करून ऊर्जा मिळवा. नोकरीत क्षुल्लक वादाला महत्त्व देऊ नका. धंद्यात लाभ होईल. गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात समस्येवर मात कराल.

शुभ दि. 1, 2

मीन – दीपावली आनंदाची

मीनेच्या भाग्येषात बुध, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. दीपावली आनंदाची, प्रगतीची ठरविण्यासाठी संयम, सहनशीलता ठेवा. कामात आळस नको. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठय़ा जबाबदार्या टाकल्या जातील. कोणताही अतिरेक नको. प्रतिष्ठा जपा. स्पर्धा कठीण वाटेल. घरातील वृद्धांची काळजी वाटेल.

शुभ दि. 29, 31