>> नीलिमा प्रधान
मेष – अहंकार नको
चंद्र, गुरू त्रिकोणयोग, चंद्र शुक्र लाभयोग. आठवडय़ात तणाव, चिंता, वादविवाद यासारखे प्रसंग घडत राहतील. रागावर ताबा ठेवा. अहंकार नको. सर्वत्र कायद्याच्या चौकटीत राहून कृती करा. नोकरीत दगदग होईल. धंद्यात गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक भारी पडतील. शब्द जपून वापरा.
शुभ दि. 24, 28
वृषभ – चर्चेत यश मिळेल
सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र गुरू त्रिकोणयोग. नवीन ओळख फसवी ठरेल. पाकिट सांभाळा. मैत्रीत, नात्यात तणाव येईल. नोकरीत हुशारी दिसेल. धंद्यात चर्चेत यश मिळेल. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. ज्ञानात भर पडेल. कठीण कामे करून घ्या.
शुभ दि. 24, 25
मिथुन – हिशेबात चूक नको
चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ प्रतियुती. खर्चावर निर्णय ठेवणे कठीण होईल. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. नोकरीत कट कारस्थान होतील. धंद्यात हिशेबात चूक नको. वसुली करा. गोड बोलून कठीण कामे करण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आळसाने नुकसान होईल. वरिष्ठांची मर्जी पाहून मत व्यक्त करा.
शुभ दि. 24, 24
कर्क – सौम्य धोरण ठेवा
सूर्य, चंद्र लाभयोग. शुक्र गुरू षडाष्टकयोग. रागाच्या भरात कुणालाही दुखवू नका. सौम्य धोरण ठेवा. प्रवासात घाई नको. अपरिचित व्यक्ती समवेत जपून वागा. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात वाढ नको. मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकारी, नेते यांना विसरू नका. वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. आत्मविश्वास काबूत ठेवा.
शुभ दि. 24, 25
सिंह – प्रवासात घाई नको
चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ केंद्रयोग. प्रत्येक दिवस उत्साहवर्धक असेल. संयम, सहनशीलता ठेवल्यास मोठे यश मिळेल. प्रवासात घाई नको. कोणतेही विधान कायद्याला धरून करा. नवीन परिचय प्रेरणादायी ठरतील. नोकरीत नम्र रहा. धंद्यात गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चेत इतरांच्या मताचा आदर करा.
शुभ दि. 26, 27
कन्या – धंद्यात पैसा सांभाळा
सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. तुम्ही ठरवलेले कार्य नेटाने पूर्ण करता येईल. क्षुल्लक वादाला, गैरसमजाला महत्त्व देऊ नका. नोकरीत बुद्धिचातुर्याची प्रशंसा होईल. प्रगती होईल. बढती मिळेल. धंद्यात पैसा सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भावनेच्या आहारी जाऊ नका. कुणाच्याही बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू नका.
शुभ दि. 27, 28
तूळ – चूक टाळता येईल
सूर्य, मंगळ त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र लाभयोग. मोठेपणाच्या आहारी न जाता कोणताही व्यवहार करा. नोकरीत सतर्क रहा. चूक टाळता येईल. नवीन परिचय उत्साहवर्धक, प्रेरणादायी ठरतील. धंद्यात वसुली होईल. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
शुभ दि. 24, 29
वृश्चिक – परदेशी जाण्याची संधी
सूर्य, मंगळ त्रिकोणयोग, चंद्र गुरू त्रिकोणयोग. उत्साह, आत्मविश्वास वाढल्याने राहून गेलेले यश मिळवता येईल. कौटुंबिक सुखात भर पडेल. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे सुधारणा होईल. चांगला भागीदार मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांच्या सहकार्याने नवे धोरण राबविता येईल. लोकप्रियता वाढेल.
शुभ दि. 24, 25
धनु – यशाचा मार्ग मिळेल
चंद्र, नेपच्यून प्रतियुती, शुक्र गुरू षडाष्टक योग. प्रकृतीची काळजी घ्या. कुटुंबात धावपळ, दगदग होईल. दुखापत टाळा. यशाचा मार्ग मिळेल. कायद्याच्या विरोधात जाऊन कोणतेही काम करू नका. नोकरीत व्याप होतील. धंद्यात खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेवर टीकात्मक चर्चा होईल. जवळच्या व्यक्ती मदत करतील.
शुभ दि. 24, 25
मकर – कार्याला दिशा मिळेल
सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र गुरू षडाष्टकयोग. जवळच्या व्यक्ती टीका करून तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करतील. रागाच्या भरात संबंध बिघडवू नका. नोकरीत प्रभुत्व वाढेल. तुमच्या परिश्रमाची कदर होईल. धंद्यात नुकसान टाळता येईल. नवे काम मिळवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याला दिशा मिळेल.
शुभ दि. 25, 26
कुंभ – जनसंपर्क वाढेल
चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, सूर्य चंद्र लाभयोग. विरोधक मैत्रीची भाषा करण्यास येतील. प्रेरणादायक घटना घडेल. नोकरीत प्रगती होईल. ओळखीतून कामे करून घेता येतील. धंद्यातील समस्या सोडवाल. कुणालाही कमी न लेखता ध्येय गाठा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनसंपर्क वाढेल. प्रतिष्ठा मिळेल. नवे डावपेच टाकता येतील.
शुभ दि. 24, 28
मीन – वाद वाढवू नका
चंद्र, बुध लाभयोग, सूर्य मंगळ त्रिकोणयोग. अनेक कामांना वेगाने पुढे नेता येईल. क्षुल्लक वादाला महत्त्व देऊ नका. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. प्रगती होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज, तणाव दूर करून कामे करता येतील. नवीन योजना सुरू करू शकाल. कौटुंबिक समस्या सुटेल.
शुभ दि. 25, 26