>> नीलिमा प्रधान
मेष – धंद्यात प्रगती होईल
मेषेच्या सुखस्थानात मंगळ, बुध शनि त्रिकोणयोग. भावनेच्या आहारी जाऊ नका. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीच्या कामात कठीण कामे करून दाखवाल. धंद्यात प्रगती होईल. हिशेब तपासा. नविन परिचयावर विश्वास ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाची, किचकट कामे करून घ्या. लोकांमध्ये तुमच्याबद्दल संभ्रम निर्माण केला जाईल.
शुभ दिनांक 22, 23
वृषभ – अहंकार दूर ठेवा
वृषभेच्या पराक्रमात मंगळ, सूर्य नेपच्यून षडाष्टक योग. उत्साह वाढेल. त्यामुळे भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घालून निर्णय घ्या. नोकरीत सावध रहा. धंद्यात कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात वरिष्ठांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. अहंकार दूर ठेवा. प्रतिष्ठा जपा.
शुभ दिनांक 24, 25
मिथुन – व्यवहारात सावध रहा
मिथुनेच्या धनेषात मंगळ, बंध, शनि त्रिकोण योग. सप्ताहाच्या सुरूवातीला भावनेच्या भरात एखादी चूक होईल. महत्त्वाची कामे करून घेत थकबाकी मिळवण्याचा प्रयत्न होईल. आर्थिक व्यवहारात घाई नको. नोकरीतील प्रभाव वाढेल. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसंगानुरूप मुद्दे मांडा. मोह, व्यसनापासून दूर रहा.
शुभ दिनांक 24, 25
कर्क – प्रवासात घाई नको
स्वराशीत मंगळ, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. अनेक प्रश्नांवर उत्तरे शोधता येतील. प्रवासात घाई नको. सर्वत्र कायदा पाळा. नोकरीत कामे वाढतील. धंद्यात लाभ, वसुली होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात किरकोळ तणाव, वाद होतील. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. प्रवासाचा आनंद घ्याल.
शुभ दिनांक 25, 26
सिंह – रागावर ताबा ठेवा
सिंहेच्या व्ययेषात मंगळ, सूर्य चंद्र लाभयोग. सप्ताहाच्या शेवटी चिंताजनक बातमी मिळेल. प्रवासात घाई नको. वस्तू जपा. नोकरीत यश मिळेल. वाद होतील. वसुली करा. सर्वत्र रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या जवळची माणसे फितूर होण्याची शक्यता. प्रतिष्ठा मिळेल. पद मिळेल.
शुभ दिनांक 21, 22
कन्या – वादाला महत्त्व नको
कन्येच्या एकादशात मंगळ, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. किरकोळ वादाला महत्त्व न देता मोठय़ा कामाकडे लक्ष द्या. यश मिळवा. नोकरीत बढती होईल. धंद्यात थकबाकी मिळवा. नविन परिचयामुळे तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. प्रवासात उतावळेपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व सिद्ध कराल. लोकप्रियता मिळेल.
शुभ दिनांक 25, 26
तूळ – कामे पूर्ण होतील
तूळेच्या दशमेषात मंगळ, बुध, शनि त्रिकोणयोग. एकाग्रता ठेवल्यास अनेक कामे पूर्ण करता येतील. नवीन ओळखीचा फायदा करून देता येईल. उत्साहवर्धक कालावधी वाटेल. नोकरीत प्रभाव वाढवा. धंद्यातील कमतरता भरून काढता येईल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चांगली संधी मिळेल.
शुभ दिनांक 22, 24
वृश्चिक – नवे करार समजून घ्या
वृश्चिकेच्या भाग्येषात मंगळ, चंद्र, गुरू लाभयोग. कोणताही निर्णय अर्धवट विचारातून घेऊ नका. कायदा पाळा. नोकरीत किचकट कामामुळे डोकेदुखी उद्भवेल. अनेकांचे सहकार्य मिळवता येईल. धंद्यात वाढ होईल. नवे करार समजून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणताही व्यवहार फसणार नाही याची काळजी घ्या. अहंकार दूर ठेवा.
शुभ दिनांक 25, 26
धनु – फसगतीची शक्यता
धनुच्या अष्टमेषात मंगळ, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. गुप्त कारवाया वाढतील. फसगत होईल. प्रवासात धोका होऊ शकतो. अपरिचित व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. नोकरीत अडचणी येतील. गैरसमज होतील. धंद्यात लाभ नको. व्यसनाने प्रकृतीवर परिणाम होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांच्या कारस्थानांवर लक्ष द्या.
शुभ दिनांक 22, 23
मकर – खरेदी विक्रीत यश
मकरेच्या सप्तमेषात मंगळ, बुध शनि त्रिकोणयोग. तुम्ही इतरांना केलेली मदत कौतुकास्पद ठरेल. नोकरीधंद्यात प्रगतीकारक घटना घडतील. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात व्यापक स्वरूपाचे कार्य करण्याची संधी मिळेल. जनसंपर्क वाढेल. खरेदी-विक्रीत यश मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. प्रेरणादायक वातावरण राहील. रागावर ताबा ठेवा.
शुभ दिनांक 24, 25
कुंभ – प्रेरणादायक काळ
कुंभेच्या षष्ठेशात मंगळ, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. मैत्री वाढेल. नवीन परिचय होतील. विरोधक मैत्रीची भाषा करतील. नोकरीत व्याप वाढेल. धंद्यात धावपळ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक आरोपांना उत्तर देता येईल. सहकार्य लाभेल. थोरामोठय़ांशी चर्चा होईल. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायक घटना घडतील.
शुभ दिनांक 22, 23
मीन – कायद्याची चौकट जाणा
मीनेच्या पंचमेषात मंगळ, सूर्य नेपच्यून षडाष्टक योग. विरोध, तणाव जाणवेल. कायद्याची चौकट बघून निर्णय घ्या. नोकरी टिकवा. वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात दगदग होईल. अहंकार नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शत्रुत्व वाढवू नका. योग्य मुद्दे मांडा. जनसंपर्क वाढवा. नम्रता हेच यश. कौटुंबिक चिंता राहील.
शुभ दिनांक 20, 24