>> निलिमा प्रधान
मेष – व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा
सूर्य, चंद्र लाभयोग, बुध गुरू त्रिकोणयोग. मानसिक दडपण येईल. तणाव राहील. क्षुल्लक कारणाने अस्वस्थ व्हाल. नोकरीत इतरांना मदत करण्यात वेळ जाईल. व्यवहारिक दृष्टिकोन ठेवावा. धंद्यात उधारी वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. भाषण फारच गाजेल. गुप्त कारवाया मात्र वाढतील.
शुभ दि. 4, 5
वृषभ – अधिकार लाभतील
चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. उत्साह वाढेल. कला-साहित्यात कल्पनाशक्तीला चालना देणारी घटना घडेल. नवीन परिचय प्रेरणादायी ठरतील. नोकरीत चांगला बदल घडेल. धंद्यात खर्च, लाभ होईल. वसुली कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार पद मिळेल. वरिष्ठांशी चर्चेत यश मिळेल. योजना मार्गी लागतील.
शुभ दि. 3, 6
मिथुन – कायदा पाळा
चंद्र शुक्र लाभयोग, सूर्य मंगळ षडाष्टकयोग. सप्ताहाच्या शेवटी तणाव, वाद, समस्या निर्माण होतील. सर्वत्र कायदा पाळा. वाहन हळू चालवा. दुखापत होईल. नोकरीत तत्परता ठेवा. चूक टाळा. धंद्यात अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या बाजूने वरिष्ठ उभे राहतील, असे समजू नका. व्यवहारात सावध रहा.
शुभ दि. 3, 4
कर्क – वाटाघाटीत यश मिळेल
सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र बुध त्रिकोणयोग. कोणतेही कठीण, रेंगाळलेले काम करून घ्या. व्यवहार पूर्ण करा. नोकरीत हुशारीचे कौतुक होईल. धंद्यात वाढ होईल. खरेदी विक्रीत लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज दूर करण्याची संधी सोडू नका. चर्चा करा. योजना मार्गी लावा. लोकप्रियता वाढवा. वाटाघाटीत यश मिळेल.
शुभ दि. 3, 4
सिंह – तटस्थ धोरण ठेवा
चंद्र, गुरू लाभयोग, सूर्य मंगळ षडाष्टक योग. ताणतणाव वाढवणाऱया घटना घडतील. दुखापत टाळा. भावनेच्या भरात व्यवहारात चूक करू नका. नात्यात, मैत्रीत गैरसमज होतील. नोकरी टिकवा. धंद्यात नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा. कायद्याला धरून बोला. वरिष्ठांना दुखवू नका.
शुभ दि. 4, 5
कन्या – सहकार्य मिळेल
बुध, गुरू त्रिकोणयोग, चंद्र गुरू लाभयोग. कठीण कामे करून घ्या. वेळेला महत्त्व दिल्यास मोठी कामे मार्गी लावता येतील. नोकरीत क्षुल्लक अडथळा येईल. धंद्यात लाभ होईल. वसुली करा. नवे कंत्राट मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक लोकांचे सहकार्य मिळेल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. शत्रू मैत्रीची भाषा करतील.
शुभ दि. 3, 6
तूळ – संयमी कृती करा
चंद्र, शनि लाभयोग, सूर्य मंगळ षडाष्टक योग. भावनेच्या भरात घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. संयमी कृती करा. सावधपणे बोला. नोकरीत अडचणी येतील. वाद टाळा. धंद्यात गोड बोला. व्यवहारात चोख रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तारेवरची कसरत करावी लागेल. मोहाच्या आहारी जाऊ नका.
शुभ दि. 4, 5
वृश्चिक – महत्त्वाच्या कामात लक्ष द्या
सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, गुरू त्रिकोणयोग. क्षुल्लक कारणाने संतप्त होऊ नका. महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. नवीन परिचय प्रेरणादायक ठरतील. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात विशेष काम कराल. नोकरीत प्रगती होईल. धंद्याला कलाटणी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. नवे संबंध प्रस्थापित होतील.
शुभ दि. 2, 3
धनु – सहनशीलता ठेवा
चंद्र, शनि लाभयोग, चंद्र, बुध त्रिकोणयोग. तणाव, गैरसमज क्षुल्ल्क कारणाने होत राहील. सहनशीलता ठेवा. नोकरीत परीक्षेचा कालावधी राहील. धंद्यात संधी मिळेल. दगदग वाढेल. उधारी वसूल करा. कर्जाचे काम करण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टीका सहन करावी लागेल. विरोधक मैत्रीची भाषा करतील.
शुभ दि. 4, 5
मकर – कार्याला वेग येईल
बुध, गुरू त्रिकोणयोग, चंद्र शुक्र लाभयोग. साडेसातीचे शेवटचे पर्व सुरू आहे. प्रत्येक कार्याला वेगाने पुढे नेता येईल. मनाप्रमाणे सहकार्य मिळेल. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. थोरामोठय़ांचा पाठिंबा मिळाल्याने कठीण प्रकरणसुद्धा सोडवता येईल. नोकरीधंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, पद वाढेल.
शुभ दि. 2, 3
कुंभ – चौफेर सावध रहा
चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य मंगळ षडाष्टक योग. उत्साह, आत्मविश्वास वाढेल परंतु उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. वक्तव्य करताना चौफेर सावध रहा. कायदा सर्वत्र पाळा. व्यवहारात फसगत टाळता येईल. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टीकात्मक आरोप होतील. तुमच्या विरोधात चर्चा होईल.
शुभ दि. 3, 4
मीन – नोकरीत वर्चस्व वाढेल
सूर्य, चंद्र लाभयोग, बुध गुरू त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस यश देणारा आहे. कठीण रेंगाळलेली कामे पूर्ण करा. क्षुल्लक कारणाने त्रस्त होऊ नका. नोकरीत वर्चस्व वाढेल. कौतुक होईल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठ तुमचे मुद्दे विचारात घेतील. पद मिळेल. खरेदी-विक्रीत लाभ होईल.
शुभ दि.3, 4