>> नीलिमा प्रधान
मेष – वैचारिक दडपण वाढेल
सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, शुक्र प्रतियुती. वैचारिक दडपण वाढेल. कायदा पाळा. शब्द जपून वापरा. जवळच्या व्यक्ती साहाय्य करतील. दगदग, धावपळ वाढेल. प्रवासात सावध रहा. दुखापत होईल. नोकरीत कठीण काळ असेल. धंद्यात व्यवहारात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे इतर व्यक्ती घेतील.
शुभ दि. 17, 18
वृषभ – कठोर शब्द नको
सूर्य नेपच्यून त्रिकोणयोग, चंद्र, बुध प्रतियुती. प्रत्येक दिवस अतिमहत्त्वाचा ठरवता येईल. मैत्रीत, नात्यात गैरसमज, तणाव निर्माण होईल. नोकरीच्या कामात वर्चस्व वाढेल. धंद्यात वाढ होईल. भागीदाराशी चर्चा करताना भान ठेवा. कठोर शब्द नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकारात वाढ होईल. जनहिताच्या कार्यात चालढकलपणा नको.
शुभ दि. 19, 20
मिथुन – उतावळेपणा नको
सूर्य, चंद्र षडाष्टक योग. चंद्र, शुक्र प्रतियुती. गुप्त कारवाया, विरोधकांना कमी लेखू नका. कोणतेही भाष्य कायद्याला धरूनच करा, उतावळेपणा नको. नोकरीच्या कामात अरेरावी नको. आळसाने धंद्यात समस्या होतील. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भावनेपेक्षा प्रत्यक्ष कृतीला, विचारांना महत्त्व असते.
शुभ दि. 20, 21
कर्क – रागावर नियंत्रण ठेवा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र बुध प्रतियुती. मनावर दडपण, तणाव, खर्च सप्ताहाच्या सुरूवातीला होईल. खाण्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत प्रगती, कठीण काम करून दाखवाल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्ती अडचणी आणतील. प्रतिष्ठा सांभाळता येईल.
शुभ दि. 21, 22
सिंह – शब्द जपून वापरा
चंद्र, शुक्र प्रतियुती. शुक्र, शनि लाभयोग. आर्थिक व्यवहारात लाभ. कायदा पाळा. आपल्यापेक्षा इतर व्यक्तीही हुशार असतात हे विसरू नका. नोकरीत शब्द जपून वापरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दबाव राहील. शब्द बदलल्याचा आरोप होईल. नम्रता, चातुर्य ठेवा. प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होईल. अहंकाराने बुद्धिचा नाश होतो, हे लक्षात ठेवा.
शुभ दि. 17, 18
कन्या – महत्त्वाची कामे करा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, बुध प्रतियुती. सप्ताहाच्या सुरूवातीला अतिमहत्त्वाची कामे करा. मदत करणारी व्यक्ती ऐनवेळी दूर जाण्याची शक्यता. नोकरीच्या कामात प्रगती होईल. बढती मिळेल. धंद्यात स्पर्धा करणारे वाढतील. नवीन ओळखी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, पद मिळेल. वरिष्ठ तुमचे मुद्दे विचारात घेतील.
शुभ दि. 20, 21
तूळ – नोकरीत प्रगती होईल
चंद्र, बुध प्रतियुती, शुक्र, शनि लाभयोग. रेंगाळलेली कामे करण्याचा प्रयत्न करा. यश मिळेल. नोकरीत प्रगती होईल. बदलीची शक्यता. धंद्यात जम बसेल. थकबाकी मिळवा. तुमच्या क्षेत्रात सुधारणा होतील. समस्या कमी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज दूर करून घ्या. योजनांना पुढे न्याल. वरिष्ठांशी चर्चेची शक्यता.
शुभ दि. 19, 20
वृश्चिक – तणावाकडे दुर्लक्ष करा
बुध, गुरू प्रतियुती, सूर्य नेपच्यून त्रिकोणयोग. क्षुल्लक तणावाकडे दुर्लक्ष करा. महत्त्वाची कामे करा. नोकरीत बुद्धिचातुर्याचे कौतुक होईल. मनाप्रमाणे बदल करण्याची संधी मिळेल. परदेशी जाण्याची संधी. धंद्यात मोठी उलाढाल होईल. जम बसेल. कर्जाचे काम होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच टाका.
शुभ दि. 17, 21
धनु – कामात सावध रहा
चंद्र, शुक्र प्रतियुती, शुक्र शनि लाभयोग. क्षेत्र कोणतेही असो अहंकारयुक्त भाष्य समस्या निर्माण करेल. दुखापत संभवते. सावधपणे काम करा. कुणालाही गृहित धरू नका. नोकरी टिकवा. सर्वत्र कायदा पाळा. धंद्यात चूक नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक जोरदार हल्लाबोल करतील. तटस्थ धोरण ठेवा.
शुभ दि. 18, 19
मकर – गुंतवणुकीची घाई नको
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध, गुरू प्रतियुती. कोणावरही विश्वास ठेवू नका. प्रवासात सावध रहा. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत स्पर्धा करणारे वाढतील. धंद्यात गुंतवणुकीची घाई नको. व्यसन त्रासदायक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्तींपासून कटू अनुभव येतील. गैरसमज, तणाव दूर होईल. प्रतिष्ठा राखाल. खर्च वाढेल.
शुभ दि. 17, 21
कुंभ – नोकरीत व्याप वाढतील
सूर्य, नेपच्यून त्रिकोणयोग, शुक्र शनि लाभयोग. गुप्त कारवायांना कमी लेखू नका. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील. जिद्दीने यश खेचावे लागेल. नोकरीत व्याप असला तरी प्रशंसा होईल. कठीण काम करून दाखवाल. धंद्यात धावपळ होईल. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येईल.
शुभ दि. 18, 19
मीन – प्रगतीची संधी मिळेल
चंद्र, बुध प्रतियुती, सूर्य नेपच्यून त्रिकोणयोग. साडेसाती सुरू असली तरी प्रगतीची संधी मिळेल. महत्त्वाची कामे होतील. आत्मविश्वास व उत्साह वाढेल. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार लाभतील. लोकप्रियता मिळेल. अनेकांचे सहकार्य मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात पुढे जाल.
शुभ दि. 17, 21