
>> नीलिमा प्रधान
मेष – सौम्य धोरण ठेवा
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू प्रतियुती. मन विचलित करणारा सप्ताह आहे. संयमाने, बुद्धी कौशल्याने वागल्यास कठीण प्रसंगावर मात करता येईल. नोकरीत सौम्य धोरण ठेवा. धंद्यात वाद वाढवू नका. फायदा होईल. स्वतच्या प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वाढलेले वर्चस्व इतरांना खपणार नाही. शुभ दि. 18, 19
वृषभ – नवे कंत्राट मिळेल
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-शुक्र प्रतियुती. जवळच्या व्यक्तीविषयी चिंता निर्माण होईल. परंतु हे सर्व थोडय़ा वेळासाठी असेल. नोकरीत कामामध्ये प्रगती, कौतुक होईल. धंद्यात वाढ, सुधारणा शक्य होईल. नवे कंत्राट मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळेल. अभ्यासपूर्ण मुद्दे वरिष्ठांच्या मनावर ठसतील. शुभ दि. 16, 20
मिथुन – रागावर ताबा ठेवा
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-शुक्र प्रतियुती. प्रकृतीत सुधारणा होईल. कोणताही किचकट, कठीण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई नको. नोकरीत टिकून राहता येईल. धंद्यातील तणाव कमी करू शकाल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या मतानुसार वागल्यास अनेक कामे पुढे जातील. शुभ दि. 17, 19
कर्क – सहकार्याची भावना ठेवा
चंद्र-गुरू प्रतियुती, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग. सहनशीलता, दूरदृष्टीकोन, सहकार्याची भावना ठेवल्यास सप्ताहात यश खेचता येईल. नोकरीच्या ठिकाणी लक्ष द्या. तडजोड ठेवा. धंद्यात अरेरावी नको. हिशेबात गोंधळ होईल. सावध रहा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपशब्द वापरू नका. शुभ दि. 17, 20
सिंह – प्रत्येक दिवस महत्त्वाचा
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू प्रतियुती. प्रत्येक दिवस महत्त्वाचा, यशाचा, किर्तीचा असेल. भावनाविवश होऊन कोणतीही चूक करू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांचे काम करावे लागेल. जवळच्या व्यक्ती स्पर्धा करतील. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे प्रभावी ठरतील. प्रतिष्ठा वाढेल. घरगुती नाराजीकडे लक्ष द्या. शुभ दि. 16, 17
कन्या – वरिष्ठांची मर्जी राखा
चंद्र-शुक्र प्रतियुती, चंद्र-गुरू त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस उत्साह, आत्मविश्वास देणारा आहे. नम्रता ठेवा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. धंद्यात उर्मटपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. परिस्थितीचे अवलोकन करा. मत व्यक्त करण्याची घाई नको. प्रतिष्ठा जपा. जवळच्या व्यक्ती त्रस्त करतील. शुभ दि. 19, 20
तूळ – धंद्यात वाढ होईल
चंद्र-बुध त्रिकोणयोग, चंद्र-मंगळ केंद्रयोग. मन अस्थिर ठेवल्यास निर्णयात चूक होऊ शकते. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. नोकरीत प्रभाव वाढेल. मैत्रीत नाराजी होईल. धंद्यात उधारीवर माल देताना विचार करा. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या समवेत चर्चेत यश मिळेल. शुभ दि. 21, 22
वृश्चिक – क्षुल्लक चूक होईल
चंद्र-गुरू त्रिकोणयोग, चंद्र-शुक्र प्रतियुती. विरोधकांना कमी लेखू नका. व्यवहारात सावध रहा. अहंकाराची भावना ठेवू नका. नोकरीत सतर्क राहून काम करा. धंद्यात दगदग होईल. पाकीट सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक चूक होईल. वादग्रस्त विधान टाळा. कायदा पाळा. प्रवासात सावध रहा. शुभ दि. 17, 22
धनु – प्रेरणादायक घटना घडतील
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-शुक्र प्रतियुती. जवळच्या माणसांची समस्या सोडवताना तारेवरची कसरत करावी लागेल. वाहन जपून चालवा. कामे करताना घाई नको. नोकरीत बुद्धिची चमक दिसेल. धंद्यात वाढ होईल. नवा विचार होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रेरणादायक घटना घडेल. तुमचे विचार प्रभावी ठरतील. शुभ दि. 16, 17
मकर – कामाचे नियोजन करा
चंद्र-गुरू त्रिकोणयोग, चंद्र-शुक्र प्रतियुती. साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तुमच्या हिताच्या दृष्टीने काही घटना घडतील. विचारपूर्वक रूपरेखा आखून कामे करा. नोकरीत बढती होईल. धंद्यात गुंतवणूक वाढेल. नवे कंत्राट मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. योजनेवर, कार्यावर भर द्या. शुभ दि. 16, 17
कुंभ – कामांना पुढे न्याल
चंद्र-मंगळ त्रिकोणयोग, चंद्र-शुक्र प्रतियुती. अनेक कामांना वेगाने पुढे नेण्यात यश मिळेल. भ्रमात राहू नका. वेळेला, व्यक्तीला महत्त्व द्या. गुप्त कारवायांवर नजर ठेऊन रहा. कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. नोकरीधंद्यात प्रगती, समस्या सोडवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्रीची भाषा करतील. शुभ दि. 19, 20
मीन – धंद्यात सावध रहा
चंद्र-गुरू त्रिकोणयोग. चंद्र-शुक्र प्रतियुती. उतावळेपणाने कोणतेही भाष्य करणे उचित ठरणार नाही. राग व अहंकार ठेवल्यास जुळत आलेले काम फिसकटण्याची शक्यता आहे. चातुर्य वापरा. नोकरी टिकवा. धंद्यात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अति विश्वास ठेवू नका. तडजोड ठेवा. तटस्थ भूमिका तात्पुरती ठेवा. शुभ दि.16, 20