साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 15 सप्टेंबर ते शनिवार 21 सप्टेंबर 2024

>> नीलिमा प्रधान

मेषअनाठायी खर्च होतील

कन्येत सूर्य, तुळेत शुक्र. बुध, शनि प्रतियुती. शारीरिक, मानसिक दडपण, धावपळ होईल. दगदग होईल. अनाठायी खर्च होतील. मैत्रीत, नात्यात गैरसमज होतील. नोकरीमध्ये अस्थिरता जाणवेल. धंद्यात वाद, नुकसान टाळा. कोणताही मोठा निर्णय घेण्यात चूक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळची माणसं कोणत्याही थराला जातील.

शुभ दिनांकः  15, 16

वृषभनोकरीत प्रगती होईल

सूर्य, हर्षल त्रिकोणयोग, कन्येत सूर्य, तुळेत शुक्र. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे वेगाने होतील. डोळ्यांची काळजी घ्या. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात लाभ, वाढ होईल. नवीन करार होतील. घरगुती समस्या सोडवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज दूर सारून नवे संबंध प्रस्थापित करता येतील.

शुभ दिनांकः  15, 16

मिथुनहिशेबात चोख रहा

बुध, शनि प्रतियुती, कन्येत सूर्य, तुळेत शुक्र. सार्वजनिक कामात धाडस नको. बोलताना काळजी घ्या. अहंकार दूर ठेवा. नोकरीत धावपळ, काम वाढेल. धंद्यात हिशेब तपासा. चर्चेत तणाव होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. वरिष्ठांची मर्जी पाहून मत व्यक्त करा. मनावर दडपण राहील.

शुभ दिनांकः  16, 17

कर्कप्रवासात घाई नको

सूर्य, नेपच्युन प्रतियुती, शुक्र तुळेत, कन्येत सूर्य. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सौम्य धोरण ठेवा. तडजोडीची तयारी ठेवा. तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात लाभ होईल. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य मिळेल. मुद्दे प्रभावी ठरतील. वरिष्ठांना खूष कराल. विरोधकांना योग्य उत्तर देता येईल.

शुभ दिनांकः  15, 19

सिंहतणाव दूर ठेवा

शुक्र, गुरू त्रिकोणयोग, शुक्र, तुळेत, कन्येत सूर्य. तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. क्षुल्लक तणावाला महत्त्व देऊ नका. नवीन परिचय उत्साह वाढवणारे, ज्ञानात भर घालणारे ठरतील. कला, क्रिडा, साहित्य क्षेत्रात चमकाल. नोकरीधंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना गतिमान कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

शुभ दिनांकः  16, 17

कन्याकठोर शब्द नको

सूर्य, नेपच्यून प्रतियुती, कन्येत सूर्य, तुळेत शुक्र. जुना वाद, गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करा. कठोर शब्द नको. नोकरीत वरिष्ठांशी नम्रपणे वागा. धंद्यात लाभ, तेजी येईल. वसुलीच्या कामात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेचांना कमी लूखू नका. कायद्यानुसार वागा. प्रतिष्ठा, लोकप्रियता मिळेल. भावनांना आवरा.

शुभ दिनांकः  15, 18

तूळभावनांचा गुंता टाळा

चंद्र, बुध त्रिकोणयोग. शुक्र तुळेत, कन्येत सूर्य. क्षेत्र कोणतेही असो उत्साह, आत्मविश्वास नियंत्रणात ठेवा. गैरफायदा घेऊन तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होईल. कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या. कायदा पाळा. भावनांचा गुंता टाळा. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहंकार नुकसान करेल.

शुभ दिनांकः  20, 21

वृश्चिकरागावर ताबा ठेवा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, शुक्र तुळेत, कन्येत सूर्य. सप्ताहाच्या शेवटी तणाव जाणवेल. प्रवासात घाई नको. रागावर ताबा ठेवा. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात नवे कंत्राट लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर गाजावाजा होईल. तुमचे मुद्दे महत्त्वाचे वाटतील. वाटाघाटीत काळजी घ्या. दुखापतीची शक्यता आहे.

शुभ दिनांकः  15, 19

धनुप्रकृतीत सुधारणा होईल

कन्येत सूर्य, तुळेत शुक्र, सूर्य नेपच्युन युती. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. गैरसमज, तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीत सुधारणा होईल. नोकरीधंद्यात चांगली घटना घडेल. चर्चेत यश मिळेल. नवा परिचय फायदेशीर ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच टाकण्याचा विचार होईल. अचानक कलाटणी मिळेल.

शुभ दिनांकः  16, 17

मकरसावधपणे बोला

सूर्य, प्लुटो त्रिकोणयोग, कन्येत सूर्य, तुळेत शुक्र विचारांचा गुंता सोडवता येईल. समस्येवर समाधान शोधाल. प्रत्येक दिवस आत्मविश्वास वाढवणारा. नोकरीधंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावधपणे बोला. कायदा पाळा. लोकप्रियता, प्रतिष्ठा वाढवणार्या घटना घडवता येतील. अनेकजण तुमची स्तुती करतील.

शुभ दिनांकः  16, 17

कुंभनोकरीत स्पर्धा वाढेल

कन्येत सूर्य, तुळेत शुक्र, चंद्र मंगळ लाभयोग. क्षेत्र कोणतेही असो प्रतिक्रिया सावधपणे द्या. कायदा पाळा. गुप्त कारवायाकडे दुर्लक्ष नको. पोटाची काळजी घ्या. नोकरीत स्पर्धा वाढेल. दबाव राहील. धंद्यात लाभ, चर्चा करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणीतून पुढे जावे लागेल. सहकार्य मिळवणे कठीण असेल.

शुभ दिनांकः  19, 20

मीनकामाचा ताण जाणवेल

कन्येत सूर्य, तुळेत शुक्र. भावनाविवश होऊन बोलू नका. स्पर्धा करणारे टिका करतील. मोह, व्यसने टाळा. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. धंद्यात वाद नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील डावपेच ओळखा. प्रतिक्रिया देण्याचा उतावळेपणा करू नका. संधी मिळेल. आर्थिक व्यवहारात फसगत टाळा. कोर्टाच्या कामात तत्परता ठेवा. कागदपत्रे सांभाळा.

शुभ दिनांकः  19, 20