>> नीलिमा प्रधान
मेष – प्रतिष्ठा जपा
मेषेच्या अष्टमेषात सूर्य, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. धावपळ, दगदग वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात धोका पत्करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत प्रभाव दिसेल. हिशेब चुकवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अचानक बदल होतील. तणाव दूर करा. प्रतिष्ठा जपा. तुमच्या कामाची जिद्द महत्त्वाची ठरेल.
शुभ दि. 10, 11
वृषभ – वाद वाढवू नका
वृषभेच्या सप्तमेषात सूर्य, शुक्र, मंगळ षडाष्टक योग. नवीन कार्याची रूपरेषा तयार करा. संधीची वाट पाहावी लागेल. कुठेही उतावळेपणा, अहंकार ठेवू नका. नोकरीच्या कामात हलगर्जीपणा त्रासदायक ठरेल. नविन परिचय फसवा ठरेल. धंद्यात मोह नको. परिस्थिती सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक वाद वाढवू नका.
शुभ दि. 12, 16
मिथुन – गैरसमज मिटवा
मिथुनेच्या षष्ठेषात सूर्य, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. महत्त्वाची कठीण कामे सप्ताहाच्या सुरूवातीला पूर्ण करा. नोकरीत प्रगतीचे, कामाचे कौतुक होईल. धंद्यात वाढ, लाभ होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांची भेट घेऊन चर्चा करा. गैरसमज मिटवा. योजनांच्या ठिकाणी आळस नको.
शुभ दि. 10, 11
कर्क – व्यवहारात फसगत टाळा
कर्केच्या पंचमेषात सूर्य, शुक्र, मंगळ षडाष्टक योग. मैत्रीत, नात्यात, सहकारी वर्गासमवेत तणाव, गैरसमज, नाराजी होईल. संयम ठेवा. प्रवासात काळजी घ्या. कोणताही वाद टोकाला जाऊ देऊ नका. नोकरीत कामे वाढतील पण प्रभाव राहील. धंद्यात सौम्य मित्र व शत्रू बदलण्याची शक्यता आहे. व्यवहारात फसू नका.
शुभ दि. 13, 16
सिंह – नोकरीत व्याप वाढेल
सिंहेच्या चतुर्थात सूर्य, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. राग वाढवणाऱया घटना आजुबाजूला सतत घडतील. संयम ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. वाहनापासून त्रास होईल. नोकरीमध्ये व्याप वाढेल. मित्र, सहकारी मदत करतील. धंद्यात स्मितहास्य उपयोगी ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचारपूर्वक डावपेच टाका. अहंकार, संताप त्रासदायक ठरेल.
शुभ दि. 10, 11
कन्या – प्रवासात सावध रहा
कन्येच्या पराक्रमात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोणयोग. शत्रू कोण व मित्र कोण हे समजणे कठीण होईल. वादाला महत्त्व न देता कामे करा. नोकरीमध्ये तणाव, गैरसमज होतील. धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वाढते प्राबल्य इतरांना सहन होणार नाही. प्रक्षोभक घटना घडवल्या जातील. प्रवासात सावध रहा.
शुभ दि. 12, 13
तूळ – नवीन संधी मिळतील
तूळेच्या धनेषात सूर्य, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. महत्त्वाची कामे करा. गोड बोलून कामे करता येतील. नवीन परिचय प्रेरणादायक ठरतील. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. नवीन संधी तुमच्या क्षेत्रात मिळतील. नोकरीत चांगली बातमी मिळेल. पद मिळेल. नव्या योजना पुढे नेता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांची मर्जी राखाल.
शुभ दि. 14, 15
वृश्चिक – विचारांचा गुंता वाढेल
स्वराशीत सूर्य, चंद्र, शनि युती. कोणताही निर्णय घाईत ठरवू नका. चौफेर विचारांचा गुंता वाढेल. जवळच्या व्यक्ती मदत करतील. नोकरीत काम वाढेल. अचानक कामात बदल झाल्याने विचलित होऊ नका. धंद्यात नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोपांना सामोरे जावे लागेल. बुद्धिचातुर्याने बाहेर पडा. खरेदी-विक्रीत लाभ होईल.
शुभ दि. 12, 16
धनू- प्रकृतीची काळजी घ्या
धनुच्या व्ययेषात सूर्य, चंद्र, शनि युती. अचानक कलाटणी देणाऱया घटना घडतील. व्यवहारात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात धोका संभवतो. घाई नको. नोकरीच्या ठिकाणी शाब्दिक चकमक होईल. राग वाढवणारे प्रसंग टाळणे कठीण होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सप्ताहाच्या सुरूवातीला कठीण कामे करा.
शुभ दि. 12, 13
मकर – जनसंपर्क टाळा
मकरेच्या एकादशात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस यशदायी ठरवता येईल. गोड बोलण्यावर भाळू नका. भावनेच्या भरात आश्वासन देऊ नका. मोह, व्यसन नको. नोकरीत प्रभाव राहील. जवळच्या व्यक्ती स्पर्धा करतील. धंद्यात नुकसान टाळा. सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. जनसंपर्क सांभाळा. कठोर शब्द नको.
शुभ दि. 12, 16
कुंभ – कार्याला पुढे न्याल
कुंभेच्या दशमेषात सूर्य, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. तुमच्या कार्याला वेगाने पुढे नेता येईल. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. महत्त्वाची कामे करून घ्या. नवीन परिचय फायदेशीर ठरतील. नोकरीधंद्यात सुधारण होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच यशस्वी होतील. कायद्याच्या बाजूने बोला. आरोपांना उत्तरे देता येईल.
शुभ दि. 12, 13
मीन – संधीची वाट पहा
मीनेच्या भाग्येषात सूर्य, चंद्र, गुरू लाभयोग. मंगळवारपासून समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल. संयम व सहनशीलता ठेवल्यास ओळखी पारखून घेता येतील. संधीची वाट पाहून पुढे जा. नोकरीच्या कामात चूक टाळता येईल. धंद्यात अरेरावी नको. पैसा जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संभ्रम वाढेल. तटस्थ रहा.
शुभ दि. 15, 16