>> नीलिमा प्रधान
मेष – क्षुल्लक तणाव होईल
मेषेच्या दशमेषात शुक्र, रवि बुध युती. कोणत्याही चर्चेत संयम, नम्रता ठेवूनच मुद्दे मांडा. नोकरीत मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा. तुमच्या कार्याला पुनेता येईल. धंद्यात राग नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग, धावपळ, क्षुल्लक तणाव होईल. दुसऱयांच्या मताचा विचार करा. तहाची भाषा ठेवा. स्पर्धा कठीण आहे.
शुभ दि. 3, 4
वृषभ – कौतुकास्पद काम कराल
वृषभेच्या भाग्येषात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करून प्रगतीचा मार्ग शोधता येईल. तुमचे धाडस, मुत्सद्दीपणा कौतुकास्पद ठरेल. धंद्यात नवे धोरण, नवे भागीदार येतील. नोकरीत कौतुकास्पद काम कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जिद्द, महत्त्वाकांक्षा, दूरदृष्टिकोन यांचे योग्य फळ मिळेल. घरगुती कामे होतील.
शुभ दि. 6, 7
मिथुन – निर्णयात घाई नको
मिथुनेच्या अष्टमेषात शुक्र, चंद्र मंगळ प्रतियुती. कोणताही निर्णय घेताना घाई करू नये. जवळच्या व्यक्तींना दुखवू नये. नवीन परिचय मनस्ताप देण्याची शक्यता. नोकरी टिकवा. धंद्यात नम्रता ठेवा. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शब्द शस्त्र असतात हे विसरू नका. आरोप सहन करून स्वतची चूक समजून घ्या.
शुभ दि. 3, 4
कर्क – वाटाघाटीत यश मिळेल
कर्केच्या सप्तमेषात शुक्र, सूर्य बुध युती. संयम ठेवल्यास अनेक कठीण कामे करून घेता येतील. दिग्गज व्यक्तींचा पाठिंबा राहील. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. नोकरीत महत्त्वपूर्ण काम कराल. धंद्यात लाभ होईल. दगदग वाराजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वातुमच्या कार्याचे कौतुक होईल. वाटाघाटीत यश मिळेल.
शुभ दि. 24, 25
सिंह – प्रकृतीकडे लक्ष द्या
सिंहेच्या षष्ठात शुक्र, बुध गुरू प्रतियुती. अहंकाराची भाषा कुठेही उपयुक्त ठरणार नाही. जुने मतभेद नव्याने वाशकतात. सावध रहा. मनस्ताप, धोका होईल. काळजी घ्या. प्रकृतीकडे लक्ष द्या. नोकरीत तणाव राहील. धंद्यात नुकसान टाळा. तुमचा विचार सर्वांना पटेलच असे नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अस्थिरता जाणवेल. संयम ठेवा.
शुभ दि. 3, 4
कन्या – धंद्यात पैसा सांभाळा
कन्येच्या पंचमेषात शुक्र, सूर्य, चंद्र लाभयोग. अनेक कामांना गतिमान करू शकाल. देवदिपावली शुभ ठरेल. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे बदल, सुधारणा होतील. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील. मुद्दे महत्त्वाचे ठरतील. लोकप्रियता वाअनेक योजना राबविता येतील. घरात शुभसंकेत मिळतील.
शुभ दि. 5, 6
तूळ – नवे भागीदार मिळतील
तूळेच्या सुखस्थानात शुक्र, रवि बुध युती. प्रत्येक दिवस यशाचा ठरवण्यासाठी जिद्द, मेहनत ठेवा. कुठेही अहंकार नको. यश खेचता येईल. नोकरीधंद्यातील तणाव, चिंता कमी होईल. थकबाकी वसूल करा. नवे भागीदार मिळतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वेगळ्या पद्धतीची संधी मिळू शकेल. कुठेही भाळू नका.
शुभ दि. 3, 4
वृश्चिक – प्रगतीचा टप्पा गाठाल
वृश्चिकेच्या पराक्रमात शुक्र, सूर्य, बुध युती. शह देण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. नोकरीत बदल होईल. धंद्यात नवे धोरण, नवे विचार फायदेशीर ठरतील. वसुली करा. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर प्रगतीचा, कार्याचा चौघडा वाजेल. विरोधकांना नमवता येईल.
शुभ दि. 3, 4
धनु – हिशेबात चूक नको
धनुच्या धनेषात शुक्र, शुक्र नेपच्यून लाभयोग. सलोख्याने, प्रेमाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. गुप्त कारवाया करणारे प्रसंग घडतील. नोकरी टिकवा. धंद्यात नम्रता ठेवा. हिशेबात चूक नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पाणउतारा होईल. संयमाने मुद्दे मांडा. वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावा. स्पर्धा कठीण आहे.
शुभ दि. 6, 7
मकर – संयम ठेवा
स्वराशीत शुक्र, सूर्य बुध युती. महत्त्वाची कामे करून घेता येतील. संयम ठेवा म्हणजे गैरसमज टाळता येईल. नोकरीत धावपळ होईल, परंतु यश मिळेल. धंद्यात लाभ होईल. कोर्टकचेरीचा प्रश्न लवकर सोडवता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. चर्चेत, भेटीत यश मिळेल. कौटुंबिक कामे होतील. धोरण ठरवा.
शुभ दि. 6, 7
कुंभ – धंद्यात फसगत टाळा
कुंभेच्या व्ययेषात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. मैत्रीचे नाटक करून तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. सावध रहा. नोकरीत प्रभाव पडेल. धंद्यात फसगत टाळा. चर्चेत यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्रीची भाषा करतील. तुमच्या मुद्यांना वरिष्ठ विचारात घेतील. अािर्थक व्यवहारात सतर्क रहा.
शुभ दि. 2, 3
मीन – नोकरीत बढती होईल
मीनेच्या एकादशात शुक्र, सूर्य बुध युती. सप्ताहाच्या सुरुवातीलाच महत्त्वाची कामे करा. क्षुल्लक अडचणींवर मात कराल. यश मिळवाल. नोकरीत बहोईल. लाभ, प्रशंसा होईल. नवीन नोकरीचा प्रयत्न करा. धंद्यात वाहोईल. उत्साह व आत्मविश्वास वाराजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांना सहकार्य करून मोठे व्हाल.
शुभ दि. 3, 4