मेष – रागावर ताबा ठेवा
मेषेच्या पराक्रमात मंगळ वक्री, दशमेषात बुध. कसोटीचा सप्ताह वाटेल. धावपळ करावी लागेल. नोकरीत कटकटी वाढतील पण प्रभाव राहील. धंद्यात फायदा पण तणाव जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे पटवून देणे कठीण वाटेल. प्रतिष्ठा राहील. रागावर ताबा ठेवा. मैत्रीपूर्ण वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
शुभ दि. 21, 21
वृषभ- प्रकृतीची काळजी घ्या
वृषभेच्या धनेषात मंगळ वक्री. भाग्येषात बुध. क्षुल्लक ताणतणाव वाढवू नका. प्रकृतीची काळजी घ्या. यांत्रिक बिघाडावर खर्च होईल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धंद्यातील वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गुंता सोडवता येईल. योजना गतिमान होतील. चर्चेत यश मिळेल. घरगुती चिंता निवळेल. खरेदी-विक्रीत लाभ होईल.
शुभ दि. 19, 20
मिथुन – नोकरीत चूक टाळा
स्वराशीत मंगळ वक्री, अष्टमेषात बुध. मानसिक संतुलन कायम ठेवा. रागावर ताबा ठेवा. अरेरावी, अहंकार यामुळे समस्या वाढेल. नोकरीत सहनशीलता ठेवा. चूक टाळा. धंद्यात भांडण नको. फायदा पहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात माघार घ्यावी लागण्याची शक्यता. आरोप, संताप यामुळे विचलित व्हाल.
शुभ दि. 22, 23
कर्क – व्यवहार सावधपणे करा
कर्केच्या व्ययेषात मंगळ वक्री, सप्तमेषात बुध. कठोर शब्द वापरू नका. कुठेही गैरसमज होतील. नाराजीची शक्यता. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल पण स्पर्धा वाढेल. खाण्याची काळजी घ्या. धंद्यातील व्यवहारात बळी पडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकारापेक्षा तडजोड, समतोल, मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा.
शुभ दि. 19, 20
सिंह – प्रतिष्ठा जपा
सिंहेच्या एकादशात मंगळ वक्री, षष्ठेशात बुध. तुमचा उत्साह, आत्मविश्वास टिकवून ठेवता येईल. क्षेत्र कोणतेही असो उतावळेपणा नको. भावनिक गुंत्यामुळे तुमचे बोलणे, वागणे यात तणाव येईल. धंद्यात हिशेब नीट करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दडपण, दबाव राहील. प्रतिष्ठा जपताना काळजी घ्या. प्रवासात सावध रहा.
शुभ दि. 21, 22
कन्या – जबाबदारी घ्यावी लागेल
कन्येच्या दशमेषात मंगळ वक्री, पंचमेषात बुध. तुमचा विचार व्यावहारिक दृष्टिकोनातून अगदी बरोबर असेल, परंतु गैरसमज होऊ शकतात. प्रकृतीची काळजी घ्या. व्यसन, मोह नको. धंद्यात स्वत लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांना ऊत येईल. तुम्हाला मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. घरगुती समस्येवर शांतपणे विचार करा.
शुभ दि. 22, 24
तूळ – सहनशीलता ठेवा
तुळेच्या भाग्येषात मंगळ वक्री, चतुर्थेशात बुध. तणाव, वाद टाळण्याचा प्रयत्न करा. गैरसमज वाढेल. क्षुल्लक वाद कुठेही वाढवू नका. नोकरीत कामाकडे पूर्ण लक्ष द्या. धंद्यात नम्रता ठेवा. लाभ वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जास्त अपेक्षा ठेऊ नका. तडजोड ठेवा. आरोप होतील. सहनशीलता ठेवा.
शुभ दि. 22, 24
वृश्चिक – नोकरीत वाद टाळा
वृश्चिकेच्या अष्टमेषात मंगळ वक्री, पराक्रमात बुध. प्रॅक्टिकल विचार उपयुक्त ठरतील परंतु जवळच्या व्यक्तींना नाराज करू नका. प्रेमाने समजवा. नोकरीत वाद टाळा. प्रभाव वाढेल. धंद्यात आळस नको. वस्तू सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे विचार योग्य शब्दात मांडता येतील. प्रतिष्ठा वाढेल. नेते, सहकारी यांना दुखवू नका.
शुभ दि. 19, 20
धनु – प्रवासात सावध रहा
धनुच्या सप्तमेषात मंगळ वक्री, धनेषात बुध. सप्ताहाच्या शेवटी तणाव, गैरसमज, खर्च होतील. प्रवासात सावध रहा. नोकरीच्या ठिकाणी प्रगती, वाद वाढवू नका. धंद्यात नवीन संधी होतील. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा विस्तार करता येईल. नवीन परिचयाने उत्साह, आत्मविश्वास वाढेल. जनसंपर्क वाढवा.
शुभ दि. 19, 20
मकर – कर्जाची नवी संधी मिळेल
मकरेच्या षष्ठेशात मंगळ वक्री, स्वराशीत बुध. प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरवता येईल. जुना वाद, गैरसमज संपवता येतील. कर्जाची नवी संधी मिळेल. नोकरीत प्रगती होईल. तुमच्या कामात थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. व्यवहारात फायदा होईल. नवे करार होतील. मैत्रीपूर्ण वातावरण ठेवता येईल.
शुभ दि. 19, 20
कुंभ – वरिष्ठांचा दबाव राहील
कुंभेच्या पंचमेषात मंगळ वक्री, व्ययेषात बुध. कोणतीही समस्या सोडवताना मानसन्मानाचा जास्त विचार करू नका. संयम ठेवा. नोकरीच्या कामात अडचणी येतील. दगदग होतील. धंद्यात लाभ परंतु हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा दबाव राहील. आरोप होतील. तुमचा मुद्दा खोडून काढला जाईल.
शुभ दि. 22, 23
मीन – नोकरीत स्पर्धा वाढेल
मीनेच्या चतुर्थात मंगळ वक्री, एकादशात बुध. जवळच्या व्यक्ती गैरसमज करून घेतील. त्यामुळे संयमाने, प्रेमाने तुमचा विचार व्यक्त करा. वस्तू सांभाळा. नोकरीत स्पर्धा वाढेल. धंद्यात नुकसान टाळा. व्यवहारात फसगत होईल. खाण्याची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात बुद्धिचातुर्याचे कौतुक होईल.
शुभ दि. 19, 20