साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 06 एप्रिल 2025 ते शनिवार 12 एप्रिल 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – चौफेर सावध रहा

चंद्र, गुरू लाभयोग, शुक्र, शनि युती. साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. कोणताही व्यवहार करताना चौफेर सावध रहा. कायदा पाळा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या कामात लक्ष द्या. धंद्यात नुकसान टाळा. नवीन परिचयाशी जवळीक करताना घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. शुभ दि. 8, 9

वृषभ –  प्रत्येक दिवस उत्साहाचा

सूर्य, गुरू लाभयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. प्रत्येक दिवस महत्त्वाचा, उत्साहाचा व प्रेरणादायी ठरेल. किचकट कामे करून घ्या. भेटीत, चर्चेत यश मिळेल. नोकरीधंद्यात वाढ, लाभ होईल. नव्या कामाची इच्छा पूर्ण करता येईल. कला, क्रीडा, साहित्यात अव्वल राहाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज, तणाव दूर करा. शुभ दि. 6, 7

मिथुन – कठीण कामे होतील

शुक्र, शनि युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. अनेकांचे सहकार्य मिळवता येईल. कठीण कामे होतील. नवा परिचय उत्साह देणारा व फायदेशीर ठरेल. नोकरीतील किचकट कामे होतील. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. धंद्यात वाढ होईल. नवे लाभ होतील. थकबाकी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना मदत करण्याने संबंध वाढतील. शुभ दि. 9, 10

कर्क –  नोकरीत बाजी माराल

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. कलागुणांना विकसित करण्याची संधी मिळेल. अनेक व्यक्तींचा सहवास प्रेरणादायी ठरेल. नोकरीत बाजी माराल. इतरांना मदत करण्यामुळे लोकप्रियता वाढ, धंद्यात नवा करार शक्य होईल. लाभ वाढेल, गुंतवणूक करणारे मिळतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा उत्तम ठसा उमटवता येईल. शुभ दि. 9, 10

सिंह – धंद्यात मोह नको

सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, गुरू लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला तणाव, वाद, दुखापत संभवते. काळजी घ्या. कायद्याच्या चौकटीत राहून वक्तव्य करा. भावनेत न गुंतता सावध रहा. नोकरी टिकवा. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे सांभाळा. धंद्यात मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. शुभ दि. 10, 11

कन्या – तुमचे महत्त्व टिकवा

सूर्य, गुरू लाभयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. रेंगाळलेला प्रश्न, समस्या, व्यवहार पूर्ण करण्याची संधी सोडू नका. बुद्धिचातुर्य वापरून तुमचे महत्त्व टिकवता येईल. धंद्यात लाभ होईल. नोकरीत प्रभाव दिसेल. व्यसनात वेळ फुकट जाईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचा गवगवा होईल. कठीण कामे, कोर्ट केस संपवा. शुभ दि. 6, 7

तूळ – व्यवहारात काळजी घ्या

शुक्र, शनि युती, चंद्र, मंगळ लाभयोग. क्षेत्र कोणतेही असो कुणालाही शब्द देताना भाष्य करताना, व्यवहार ठरवताना काळजी घ्या. भावनेच्या आहारी जाऊ नका. गोड बोलणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्ष तशा असतातच असे समजू नका. नोकरी टिकवा. धंद्यात हिशेब नीट करा. व्यसन, मोह नुकसानकारक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज होतील. शुभ दि. 6, 7

वृश्चिक – चर्चा यशस्वी होतील

सूर्य, गुरू लाभयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. अनेक कामांना गतिमान करता येईल. भेट, चर्चा यशस्वी होतील. खरेदी-विक्रीत लाभ होईल. धंद्यात वाहोईल. नोकरीत प्रगती होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर यशाचा डंका वाजेल. अनेकांचे सहकार्य मिळेल. प्रतिष्ठा उंचावेल. शुभ दि. 11, 12

धनु – प्रकृतीची काळजी घ्या

शुक्र, शनि युती, शुक्र, मंगळ त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो भावना व कर्तव्य यांचा मेळ योग्य प्रकारे घालावा लागेल. तुमच्यावर दबाव असेल. प्रकृतीची काळजी घ्या. कोणाच्याही आहारी जाऊ नका. नोकरीत क्षुल्लक अडचणी येतील. धंद्यात उतावळेपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेताना, देताना घाई नको. शुभ दि. 9, 10

मकर – कल्पकता वाढेल

सूर्य, गुरू लाभयोग, शुक्र, मंगळ त्रिकोणयोग. कलात्मकता, कल्पकता, नवा परिचय उत्साहवर्धक व प्रेरणादायी ठरेल. कठीण कामे करा. नोकरीधंद्यात चांगला बदल शक्य होईल. थकबाकी मिळवा. जुना व्यवहार पूर्ण करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य मिळवता येईल. लोकप्रियता वाढेल. घरगुती कामे होतील. शुभ दि. 6, 7

कुंभ –  मनाचा तोल राखा

शुक्र, शनि युती, चंद्र, बुध प्रतियुती. तुमचा उत्साह वापरंतु कोणतेही विधान करताना सावध रहा. मनाचा तोल राखावा लागेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. कला, साहित्यात कल्पनाशक्ती वात्या क्षेत्रातील व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत कामे वाढतील, धंद्यात वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुणालाही कमी लेखू नका. शुभ दि. 8, 9

मीन –  वसुली होईल

सूर्य, गुरू लाभयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. तुमच्या क्षेत्रात नवे करून दाखवण्याची संधी मिळेल. कल्पकता व कुशलता यांचे कौतुक होईल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. नोकरीतील गैरसमज दूर करा. धंद्यात वाढ, लाभ, वसुली होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमचे मुद्दे विचारात घेतील. शुभ दि. 6, 7