
>> नीलिमा प्रधान
मेष – कठीण कामे करा
मेषेच्या व्ययेषात शनि, शुक्र नेपच्यून युती. मेष राशीला 29 मार्चपासून साडेसाती सुरू होत आहे. भावना व कर्तव्य यांचा मेळ घालणे कठीण होईल. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कठीण कामे करण्याचा प्रयत्न करा. शारीरिक, मानसिक दडपण वाढेल. मैत्रीत, नात्यात दुरावा निर्माण होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा. शुभ दि. 23, 24
वृषभ – प्रगतीची संधी लाभेल
वृषभेच्या एकादशात शनि, सूर्य बुध युती. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. हट्टीपणा सोडून व्यवहारिक दृष्टय़ा स्वतच्या उन्नतीकडे लक्ष द्या. कठीण कामे होतील. नवीन परिचय उत्साहवर्धक, प्रेरणादायक व फायदेशीर ठरेल. नोकरीधंद्यात विचारांना चालना मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, पद लाभेल. शुभ दि. 25, 26
मिथुन – परिचय उत्साहवर्धक
मीन राशीत शनिचे राश्यांतर, सूर्य, बुध युती. रागाला ताब्यात ठेवून बुद्धिमत्ता उपयोगात आणा. दिग्गज व्यक्तींचा परिचय दिशादर्शक तसेच उत्साहवर्धक ठरेल. नोकरीतील कठीण कामे करा. धंद्यातील चूक सुधारण्याचा प्रयत्न करा. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील. साहित्य, कला क्षेत्रात कल्पनाशक्ती वाढेल. शुभ दि. 23, 27
कर्क – प्रवासात घाई नको
मीन राशीत शनिचे राश्यांतर, शुक्र नेपच्यून युती. किचकट, न सुटणारा प्रश्न कसा सोडवता येईल याचा अंदाज घेता येईल पण घाई करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात घाई नको. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. नोकरीधंद्यात लाभ होईल. नवा परिचय वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अचानक कलाटणी मिळेल. शुभ दि. 24, 25
सिंह – प्रकृतीची काळजी घ्या
मीन राशीत शनि राश्यांतर, चंद्र गुरू त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो तारतम्य ठेवा. वक्तव्य करताना, व्यवहार करताना घाई नको. नवीन परिचय धोकादायक ठरू शकतो. नोकरी टिकवा. धंद्यात फसगत नको. व्यसन त्रासदायक ठरेल. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाच्या वस्तू हरवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा. शुभ दि. 23, 27
कन्या – रेंगाळलेली कामे होतील
मीन राशीत शनि प्रवेश, सूर्य, बुध युती. अनेक कामांना गती मिळेल. कठीण कामे करण्यात यश मिळेल. वर्चस्व वाढेल. आत्मविश्वास, उत्साह यामुळे प्रकृतीत सुधारणा होईल. नोकरीधंद्यात नवा विचार कराल. कामांची गर्दी होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिमा अधिक तेजस्वी होईल. सर्वांना चकित करणारे काम कराल. रेंगाळलेली कामे होतील. शुभ दि. 24, 25
तूळ – धंद्यात सावध रहा
मीन राशीत शनि राश्यांतर, चंद्र मंगळ त्रिकोणयोग. शारीरिक, मानसिक दडपण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. भावना व कर्तव्य यांचा मेळ घालणे महत्त्वाचे ठरेल. घरगुती वाद टाळा. नोकरी टिकवा. धंद्यात सावध रहा. कोणावरही विश्वास ठेऊ नका. महत्त्वाच्या वस्तू जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ताणतणाव, गैरसमज, दुरावा येईल. शुभ दि. 23, 27
वृश्चिक – नवी संधी मिळेल
वृश्चिकेच्या पंचमेषात शनि राश्यांतर, सूर्य, बुध युती. जीवनातील एखादा, जटील, न सुटणारा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता दिसेल. नोकरीधंद्यात अचानक सुधारणा होईल. नवी संधी मिळेल. बुद्धिचातुर्य, व्यावहारिक धोरण नक्की ठरवता येईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीकारक घटना तसेच ताणतणाव सोबत असतील. शुभ दि. 23, 25
धनु – तटस्थ रहा
29 मार्चला शनि मीनेचे राश्यांतर, सूर्य, बुध युती. प्रत्येक दिवस नवा अंदाज देणारा, नवे शिकवणारा असेल. कायद्याच्या सीमारेषा ओळखूनच सर्वत्र वाटचाल करा. फायद्यासाठी सर्व जवळीक करतात अन्यथा आपण एकटेच असतो अशी जाणीव होईल. नातेसंबंध जपा. नोकरीत अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थपणे निरीक्षण करा. शुभ दि. 25, 26
मकर – नोकरीत वर्चस्व राहील
शनि ग्रहाचे मीन राशीत राश्यांतर. शुक्र, नेपच्यून युती. मकर राशीचे साडेसातीचे पर्व संपेल. तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. स्पर्धेत बाजी माराल. तुमच्या क्षेत्रात अग्रेसर राहाल. नवा परिचय उपयुक्त ठरेल. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यातील गुंता सोडवण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जुन्या अनुभवांचा उपयोग करा. शुभ दि. 26, 27
कुंभ- आत्मविश्वास वाढेल
29 मार्च रोजी शनि कुंभेतून मीनेत प्रवेश करणार आहे. सूर्य बुध युती. साडेसातीची शेवटची अडीच वर्षे कुंभेची आहेत. तुमच्या ज्ञानात, मैत्रीत, नव्या परिचयात भर पडेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. संततीचा प्रश्न मार्गी लागेल. नोकरीतील समस्या सुटतील. धंद्यात नवी बाजारपेठ लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात व्यवहारात सावध रहा. शुभ दि. 23, 27
मीन- प्रगतीसाठी प्रयत्न करा
स्वराशीत शनिचे राश्यांतर, शुक्र, नेपच्यून युती. अनेक मार्गाने प्रगतीसाठी प्रयत्न करता येतील. तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. कुठेही उतावळेपणा नको पण दूरदृष्टी असू द्या. निरीक्षण करा. योग्य संधीची वाट पहा. नोकरीत प्रभाव वाढेल. कामाचे कौतुक होईल. थोरामोठय़ांचा सहवास लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढेल. शुभ दि. 23, 24