
>> नीलिमा प्रधान
मेष – प्रत्येक दिवस महत्त्वाचा
मेषेच्या व्ययेषात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. प्रत्येक दिवस महत्त्वाचा, यशाचा ठरवता येईल. कठीण कामे रेंगाळत ठेवू नका. नोकरीमध्ये बुद्धीचा उपयोग होईल. धंद्यात वाढ, वसुली करताना नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील चर्चा करून घ्या. योजनांच्या पूर्ततेकडे लक्ष द्या. पुढे अडचणी वाढू शकतात. घरगुती नाराजीकडे दुर्लक्ष नको.
शुभ दि. 23, 24
वृषभ – वरिष्ठांना खूष कराल
वृषभेच्या एकादशात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. अनाठायी खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. यांत्रिक बिघाडामुळे अडचण. नोकरीच्या कामात वरिष्ठांना खूष कराल. धंद्यात गुंतवणूक करणारे विचारणा करतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थोरामोठ्यांच्या ओळखी होतील. प्रतिष्ठा, पद मिळेल. व्यवहार पूर्ण करा.
शुभ दि. 28, 1
मिथुन – रागावर ताबा ठेवा
मिथुनेच्या दशमेषात बुध, बुध शनि युती. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. दगदग, धावपळ वाढेल. रागावर ताबा ठेवा. नोकरीमध्ये प्रभाव वाढेल. धंद्यात सुधारणा, नवे काम मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात उत्साह, यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या कार्यात मदत कराल.
शुभ दि. 23, 24
कर्क – वक्तव्य जपून करा
कर्केच्या भाग्येषात बुध, चंद्र शुक्र लाभयोग. दुखापत टाळा. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या कामात तणाव, वाद, नाराजी होईल. धंद्यात कायदा पाळा. शेजारी त्रस्त करतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वक्तव्य जपून करा. वैर वाढवू नका. राग नियंत्रित ठेवा. कोणत्याही व्यवहारात सतर्क रहा. वाहन जपून चालवा.
शुभ दि. 25, 1
सिंह – व्यवहारात फसगत टाळा
सिंहेच्या अष्टमेषात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. नातलग, मित्र यांच्याशी वाद होतील. धंद्यातील व्यवहारात फसगत टाळा. नोकरीमध्ये काम वाढेल. वरिष्ठांना खूष कराल. खरेदी-विक्रीत मोह नको. नवीन परिचयावर जास्त विश्वास ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे करून घ्या.
शुभ दि. 23, 24
कन्या – क्षुल्लक अडचणी येतील
कन्येच्या सप्तमेषात बुध, चंद्र, शुक्र लाभयोग. कायद्याला धरून कोणताही व्यवहार करा. थोरामोठ्यांच्या मदतीची अपेक्षा ठेवू नका. नोकरीत दगदग वाढेल. धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया होतील. आरोप होतील परंतु जवळच्या व्यक्तीची मदत होईल.कोर्टाच्या कामात सावध रहा.
शुभ दि. 25, 1
तूळ – अनाठायी खर्च टाळा
तुळेच्या षष्ठेशात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. दुसऱयावर अवलंबून राहू नका. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. धंद्यात नवे धोरण विचारपूर्वक वापरा. नवा परिचय फसवा ठरू शकतो. अनाठायी खर्च टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कठीण कामे रेंगाळत ठेवू नका. वरिष्ठांशी चर्चा करा.
शुभ दि. 23, 24
वृश्चिक – प्रवासात सावध रहा
वृश्चिकेच्या पंचमेषात बुध, चंद्र शुक्र लाभयोग. प्रवासात सावध रहा. धाडस नको. वाद, समस्या वाढणार नाही याची काळजी घ्या. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नोकरीत तणाव येईल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नोकरीत क्षुल्लक तणाव जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मतभेद होतील.
शुभ दि. 23, 1
धनु – डावपेच यशस्वी होतील
धनुच्या सुखस्थानात बुध, बुध शनि युती. तुमच्या क्षेत्रात बुद्धिचातुर्याचे कौतुक होईल. डावपेच यशस्वी होतील. नोकरीत महत्त्वाची कामे करून दाखवाल. धंद्यात धोरण सावधपणे निश्चित करा. स्वतच्या फायद्याबाबतही विचार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थोरामोठ्यांसमवेत राहाल. विचारांची देवाणघेवाण होईल.
शुभ दि. 24, 25
मकर – लोकप्रियता वाढेल
मकरेच्या पराक्रमात बुध, चंद्र शुक्र लाभयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला उतावळेपणाने कोणालाही आश्वासन देऊ नका. फसगत टाळा. नोकरीच्या ठिकाणी प्रभाव राहील. धंद्यात मेहनत घेत योग्य वाटचाल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे पारडे जड राहील. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. विवाहासंबंधी निर्णय घेता येईल.
शुभ दि. 28, 1
कुंभ – अधिकार लाभतील
कुंभेच्या धनेषात बुध, बुध मंगळ त्रिकोणयोग. वादाचा, तणावाचा प्रसंग निर्माण होईल. समतोल राखा. महत्त्व वाढेल. नोकरीत कुशलता दिसेल. धंद्यात मेहनतीला चांगला प्रतिसाद मिळेल. लाभ वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार प्राप्ती होईल. लोकप्रियता मिळण्याचे संकेत मिळतील. कायद्याच्या चौकटीत रहा.
शुभ दि. 23, 24
मीन – तटस्थ भूमिका ठेवा
स्वराशीत बुध, बुध शनि युती. गोड बोलून तुमच्या मनातील विचार काढून घेण्याचा प्रयत्न सर्वत्र होईल. तुम्हाला पुढे करून स्वतचे विचार मांडले जातील. सावध रहा. नोकरी टिकवा. धंद्यात ठाम निर्णय घेण्याची घाई नको. दगदग, धावपळ वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका ठेवा. मोह, व्यसनापासून दूर रहा.
शुभ दि. 23, 1