साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 02 मार्च 2025 ते शनिवार 08 मार्च 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – व्यवहारात फसगत टाळा

सूर्य, गुरू केंद्रयोग, बुध नेपच्युन युती. व्यवहार व भावना यांचा मेळ घालणे कठीण आहे याची जाणीव होईल. जुन्या अनुभवानुसार निर्णय घ्या. नोकरीत काम करून दाखवाल, परंतु प्रशंसा कमी मिळेल. व्यवसायात घाईत निर्णय नको. कठीण वाटणारी कामे करण्याचा प्रयत्न करा. पैशाच्या व्यवहारात फसगत टाळा. प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. 7, 8

वृषभ – प्रकृतीची काळजी घ्या

चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, गुरू युती. सप्ताहाच्या सुरुवातीला दगदग, धावपळ होईल. खर्चावर बंधन घालणे कठीण वाटेल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत कठीण कामे करावी लागतील. धंद्यात वाढ, लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थोरामोठय़ांचे परिचय प्रेरणादायी वाटतील. कोणताही व्यवहार सतर्क राहून करा. शुभ दि. 2, 7

मिथुन – नोकरीत कौतुक होईल

सूर्य, चंद्र लाभयोग, बुध नेपच्युन युती. कागदपत्रावर सही करताना सावध रहा. कुणालाही जामीन राहू नका. गोड बोलून तुमच्याकडून कामे करून घेतली जातील. स्वतचे हित पहा, पण कायदा पाळा. नोकरीत कौतुक होईल. धंद्यात वाढ होईल. करार करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी मुद्दे तुमच्याकडे असतील. शुभ दि. 2, 3

कर्क – सहनशीलता ठेवा

बुध, नेपच्युन युती, चंद्र, शुक्र लाभयोग. संयम, सहनशीलता ठेवा. प्रेमाने वागून कामे पूर्ण करावी लागतील. तुमचा राग वाढवण्याचा प्रयत्न होईल. दौऱ्यात सावध रहा. धोका स्वीकारू नका. नोकरी टिकवा. धंद्यात लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा. कायदा मोडेल असे कृत्य करू नका. लोकप्रियता उपयोगी ठरेल. शुभ दि. 2, 3

सिंह – चर्चेत यश मिळेल

सूर्य, मंगळ त्रिकोणयोग, सूर्य चंद्र लाभयोग. महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. भेटीत, चर्चेत यश मिळेल. खोटी गोड बोलणारी माणसे ओळखा. भावनेच्या आहारी जाऊन कोणालाही कोणतेही वचन देऊ नका. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खोटय़ा स्तुतीला भाळू नका. मोह नको. शुभ दि. 3, 4

कन्या – क्षुल्लक तणाव राहील

बुध, प्लुटो लाभयोग, बुध नेपच्युन युती. कुणालाही कमी लेखू नका. तुमच्यावर आरोप होतील. गोड बोलत कुशलतेने उत्तरे द्या. नोकरीत क्षुल्लक तणाव राहील. धंद्यात फसगत होईल. मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्रीचे संबंध ठेवण्यास येतील. प्रतिक्रिया देण्याची घाई करू नका. संधीची वाट पहा. संयम ठेवा. शुभ दि. 2, 7

तूळ – धंद्यात चूक टाळा

सूर्य, चंद्र लाभयोग, सूर्य मंगळ त्रिकोणयोग. सौम्य भाषा वापरून अधिकाराचा वापर करा व कामे करून घ्या. धंद्यात चूक टाळा. नोकरीत वरिष्ठांच्या कामात सहकार्य करावे लागेल. क्षेत्र कोणतेही असो शब्द जपून वापरा. नवीन परिचयावर पूर्ण विश्वास टाकू नका. गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपता येईल. शुभ दि. 3, 4

वृश्चिक –प्रवासात सावध रहा

बुध, प्लुटो लाभयोग, चंद्र शुक्र युती. कटकटी निर्माण होतील. राग वाढवून प्रश्न सोडवता येणार नाही. गोड बोला. प्रवासात, दौऱयात काम करताना सावध रहा. दुखापत होईल. नोकरीत बुद्धीची चमक दाखवा. अहंकार नको. धंद्यात लाभ होईल. नवे परिचय होतील. उत्साह वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक तणाव जाणवेल. शुभ दि. 2, 6

धनु – विचारपूर्वक व्यवहार करा

सूर्य, चंद्र लाभयोग, सूर्य मंगळ त्रिकोणयोग. मित्र, जवळच्या व्यक्ती, नातलग यांच्यासमवेत वाद, गैरसमज होतील. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात विचारपूर्वक व्यवहार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढली तरी मन अस्थिर राहील. व्यवहारिक दृष्टिकोन ठेवावा लागेल. शब्द जपून वापरा. कायदा पाळा. शुभ दि. 3, 4

मकर – लोकप्रियता वाढेल

बुध, नेपच्युन युती, सूर्य, मंगळ त्रिकोण योग. विरोधकांना कमी लेखू नका. आत्मविश्वास, उत्साह वाढेल. नवीन परिचय प्रेरणादायी ठरेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नोकरीधंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता, प्रतिष्ठा वाढेल. कार्यरत रहा. सातत्य सोडू नका. शुभ दि. 2, 6

कुंभ – डावपेच यशस्वी होतील

चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य मंगळ त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला अनेक कामे मार्गी लागतील. नवीन ओळख महत्त्वाची ठरेल. नोकरीधंद्यात उत्साहवर्धक घटना घडेल. कला, साहित्याला प्रेरणादायक वातावरण लाभेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच यशस्वी ठरतील. पद, प्रतिष्ठा मिळेल. शुभ दि. 2, 4

मीन – प्रवासात सावध रहा.

बुध, नेपच्युन युती, चंद्र, गुरू लाभयोग. प्रत्येक दिवस यशस्वी करण्यासाठी जास्त मेहनत घ्या. यश खेचता येईल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अहंकार दूर ठेवा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. चूक टाळा. धंद्यात अरेरावी करू नका. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे लागेल. प्रवासात सावध रहा. शुभ दि. 2, 4