साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 13 एप्रिल 2025 ते शनिवार 19 एप्रिल 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – धंद्यात हिशेब तपासा

मेषेत सूर्य राश्यांतर, बुध नेपच्युन युती. साडेसाती सुरू आहे. कोणत्याही क्षेत्रात मुद्दा मांडताना चौफेर विचार करा, घाई नको. नोकरीच्या कामात इतरांना मदत करण्यात वेळ खर्च होईल. धंद्यात हिशेब तपासा. मोह नको. नवीन परिचय धोकादायक ठरू शकतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भावनेच्या भरात कोणतेही आश्वासन देऊ नका. शुभ दि. 14, 18

वृषभ – हलगर्जीपणा नको

वृषभेच्या व्ययेषात सूर्य, चंद्र गुरू प्रतियुती. वरिष्ठांच्या संबंधी चिंता राहील. योग्य सल्लागाराचाच सल्ला घ्या. नोकरीच्या कामात हलगर्जीपणा नको. वरिष्ठांची नाराजी होईल. धंद्यात मेहनत घेतल्यास लाभ होईल. जवळच्या व्यक्ती मदत करतील. कला, क्रीडा, साहित्यात नवीन संधी मिळतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहजपणे वागा. शुभ दि. 16, 17

मिथुन – नोकरीत प्रभाव राहील

मिथुनेच्या एकादशात सूर्य, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. आळसात वेळ घालवू नका. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. यांत्रिक बिघाडावर खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जबाबदारी वाढेल. दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. उत्साहवर्धक घटना घडेल. शुभ दि. 13, 14

कर्क – व्यवहार पूर्ण करा

कर्केच्या दशमेषात सूर्य, बुध नेपच्यून युती. अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावा. प्रवासात घाई नको. दुखापत टाळा. किचकट व्यवहार पूर्ण करा. नोकरीत बढती, बदली होईल. परदेशी जाण्याची संधी मिळेल. कर्जाचे काम होईल. कला, क्रीडा, साहित्यात प्रतिष्ठा लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक योजनांना सहाय्य मिळेल. चांगले मित्र मिळतील. शुभ दि. 14, 15

सिंह – कामात मदत करा

सिंहेच्या भाग्येषात सूर्य, बुध नेपच्यून युती. प्रतिष्ठा वाढवणाऱया घटना घडल्या तरी बोलण्यातून गैरसमज होईल. सावध रहा. नोकरीमध्ये इतरांच्या कामात मदत करावी लागेल. धंद्यात मेहनत घ्या. हिशेब तपासा. वसुली कठीण वाटेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परस्पर विरोधी घटना घडतील. मानसन्मान मिळाला तरी नाराजी होईल. शुभ दि. 14, 18

कन्या – यश मिळवणे सोपे जाईल

कन्येच्या अष्टमेषात सूर्य राश्यांतर. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. अहंकार न ठेवता वागल्यास यश मिळवणे सोपे जाईल. नोकरीत वरिष्ठांचा विचार समजून घ्या. कठोर प्रतिक्रिया देऊ नका. धंद्यात वाढ, वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भावनेच्या आहारी न जाता मुद्दे तयार करा. लोकप्रियता वाढवता येईल. नवे संबंध येतील. शुभ दि. 14, 16

तूळ – महत्त्वाच्या वस्तू सांभाळा

तुळेच्या सप्तमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. जवळच्या व्यक्ती नाराज होण्याची शक्यता. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल. मैत्रीत वाद वाढवू नका. व्यवहारात सावध रहा. धंद्यात उतावळेपणा नको. हिशेब चुकवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिस्पर्धी कट कारस्थाने करतील. शुभ दि. 17, 18

वृश्चिक – अहंकार दूर ठेवा

वृश्चिकेच्या षष्ठेशात सूर्य राश्यांतर, बुध नेपच्यून युती. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. अहंकार न ठेवता बुद्धिचातुर्याने कामे करा. गोड बोलून समस्या सोडवा. कायदा मोडू नका. नोकरीच्या कामात सतर्क रहा. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळवता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नम्रता, संयम यावर यश खेचता येईल. शुभ दि. 18, 19

धनु – अनाठायी खर्च टाळा

धनुच्या पंचमेषात सूर्य राश्यांतर, मंगळ नेपच्यून त्रिकोणयोग. नातेसंबंध, मैत्री यामध्ये क्षुल्लक तणाव जाणवेल. गैरसमज, मनस्ताप होतील. अनाठायी खर्च टाळा. काम करताना काळजी घ्या. नोकरीत महत्त्वाचे काम कराल. धंद्यात मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे मांडताना काळजी घ्या. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. शुभ दि. 14, 19

मकर – विचारांना चालना मिळेल

मकरेच्या सुखस्थानात सूर्य राश्यांतर, चंद्र, बुध त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीलाच महत्त्वाची कामे करा. नोकरीमध्ये ताणतणाव, काम वाढेल. धंद्यात लाभ वाढेल. विचारांना चालना मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भेटीत, चर्चेत यश मिळेल. स्पष्ट मत नको. कोणताही वाद नको. मैत्री वाढेल. कल्पनाशक्तीला प्रेरणा देणारी घटना घडेल. शुभ दि. 14, 16

कुंभ – गैरसमज दूर होतील

कुंभेच्या पराक्रमात सूर्य राश्यांतर, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. तुमच्या क्षेत्रातील गैरसमज, तणाव दूर करण्याची संधी मिळेल. त्याचा उपयोग करा. नोकरीत कुशलता दिसेल. कौतुक होईल. थोरामोठय़ांचा परिचय उत्साह, आत्मविश्वास वाढवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आत्मविश्वासाने वरिष्ठांना मदत करता येईल. शुभ दि. 14, 16

मीन – प्रगतीची संधी मिळेल

मीनेच्या धनेषात सूर्य राश्यांतर, बुध नेपच्यून युती. नवा परिचय आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठांना खुश कराल. संधीचा योग्य वापर करून घ्या. धंद्यात लाभ होईल. कलात्मकता वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांकडे जास्त लक्ष द्या. आळसात, व्यसनात वेळ खर्च करू नका. शुभ दि. 17, 18