साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 26 जानेवारी 2025 ते शनिवार 1 फेब्रुवारी 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रत्येक दिवस महत्त्वाचा

मेषेच्या व्ययेषात शुक्र, बुध, प्लुटो युती. प्रत्येक दिवस महत्त्वाचा असेल. नोकरीत चांगला बदल होईल. धंद्यात सावधपणे निर्णय घ्या. वसुली लवकर करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या भावनेला दुखावण्याचा, गोड बोलून फसवण्याचा प्रयत्न होईल. सावध रहा. कठीण प्रसंग टाळता येईल. घरातील व्यक्तीची चिंता वाटेल.
शुभ दि. 26, 30

वृषभ – नोकरीत यश मिळेल

वृषभेच्या एकादशात शुक्र, बुध, प्लुटो युती. सप्ताहाच्या सुरुवातीला दडपण, तणाव, धोका जाणवेल. प्रवासात सावध रहा. नोकरीत यश मिळेल. प्रगतीची संधी लाभेल. धंद्यात लाभ होईल. नवीन परिचय फायदेशीर ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्साह, आत्मविश्वास वाढवणारे प्रसंग येतील.
शुभ दि. 30, 31

मिथुन – संयम ठेवून निर्णय घ्या

मिथुनेच्या दशमेषात शुक्र, चंद्र, मंगळ प्रतियुती. आळस केल्यास, अहंकाराने बोलल्यास, वागल्यास अडचणी वाढतील. सहनशीलता, संयम ठेवून निर्णय घ्या. नोकरीत कामे करा. धंद्यात कष्ट करा. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप, तणाव, दबाव राहील. नवीन परिचय होतील. ज्ञानात भर पडेल.
शुभ दि. 26, 27

कर्क – सौम्य धोरण ठेवा

कर्केच्या नवमेषात शुक्र, चंद्र, गुरू त्रिकोण योग. या सप्ताहात मनाविरुद्ध घटना घडतील. राग वाढेल. तडजोडीचे सौम्य धोरण ठेवा तरच कामे होतील. नोकरीत तणाव जाणवेल. धंद्यात धावपळ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दौऱयात सावध रहा. प्रतिक्रिया व्यक्त करताना घाई नको. प्रतिष्ठा सांभाळता येईल.
शुभ दि. 30, 1

सिंह – प्रकृतीची काळजी घ्या

सिंहेच्या अष्टमेषात शुक्र, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो प्रतिक्रिया व्यक्त करण्याची घाई नको. कायद्याला धरून कृती करा. नोकरीत दबाव राहील. कामात चूक संभवते. धंद्यात दादागिरी चालणार नाही. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिलेले आश्वासन पूर्ण होणे कठीण आहे. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दि. 26, 31

कन्या – संमिश्र स्वरूपाचा काळ

कन्येच्या सप्तमेषात शुक्र, सूर्य गुरू त्रिकोणयोग. संमिश्र स्वरूपांच्या घटना सर्वत्र घडतील. मनस्ताप होईल. नोकरीत अडचणी येतील. कामे वाढतील. धंद्यात हलगर्जीपणा करू नका. वाहनाचा वेग कमी ठेवा. परिचय वाढतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शत्रू व मित्र यांची सरमिसळ होईल. त्यामुळे निश्चित धोरण ठरविणे कठीण होईल.
शुभ दि. 26, 27

तूळ – प्रसंगावधान ठेवा

तुळेच्या षष्ठेशात शुक्र, चंद्र, मंगळ युती. कोणताही निश्चित निर्णय घेणे कठीण आहे. प्रसंगावधान ठेवा. नोकरीत वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात सावधगिरी बाळगा. नात्यात, मैत्रीत गैरसमज उद्भवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात इतरांना मदत करावी लागेल. वरिष्ठांच्या शब्दाबाहेर जाता येणार नाही. प्रतिष्ठा, पद, पैसा सांभाळा.
शुभ दि. 26, 27

वृश्चिक – नवे परिचय होतील

वृश्चिकेच्या पंचमेषात शुक्र, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. महत्त्वाची, कठीण कामे करून घ्या. संयम ठेवा. राग आवरा. नोकरीत चांगला बदल होईल. यश मिळेल. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक नवे परिचय होतील. चर्चा, मुद्दे यशस्वी ठरतील. नवा करार कराल. पद, प्रतिष्ठा मिळेल. घरातील कामे होतील.
शुभ दि. 26, 27

धनु – कामात कौतुक होईल

धनुच्या चतुर्थात शुक्र, चंद्र, बुध युती. मेहनत घेतल्यास कठीण कामे मार्गी लावता येतील. नोकरीच्या कामात कौतुक होईल. धंद्यातील संकटे कमी करता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुशलतेने विरोध मोडून काढून येतील. भाषणात, चर्चेत वर्चस्व वाढेल. ज्ञानात भर पडणारे प्रसंग येतील.
शुभ दि. 30, 31

मकर – वर्चस्व वाढेल

मकरेच्या पराक्रमात शुक्र, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. सप्ताहाच्या शेवटी महत्त्वाची कामे करा. रागाच्या भरात तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नोकरीत प्रगती होईल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव, वर्चस्व वाढेल. विचारांना चालना देणारी घटना घडेल.
शुभ दि. 26, 27

कुंभ – क्षुल्लक तणाव जाणवेल

कुंभेच्या धनेषात शुक्र, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. अडचणींवर मात करून कामे करावी लागतील. अरेरावी केल्यास समस्या वाढेल. घरात क्षुल्लक वाद, तणाव जाणवेल. नोकरीच्या कामात आळस, दुर्लक्ष नको. धंद्यात लाभ आहते, पण भांडण टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे खोडून काढले जातील.
शुभ दि. 26, 27

मीन – कामाचा ताण जाणवेल

स्वराशीत शुक्र, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. किचकट महत्त्वाची कामे लवकर संपवा. क्षुल्लक वादाला मोठे स्वरूप देऊ नका. वाहनाचा योग्य वापर करा. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठ कौतुक करतील. धंद्यातील ताण कमी होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांशी योग्य संवाद साधा.
शुभ दि. 26, 28