साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 सप्टेंबर ते शनिवार 28 सप्टेंबर 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – चर्चेत वाद वाढेल

मेषेच्या षष्ठेशात बुध, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या शेवटी तणाव, चिंता जाणवेल. कायद्याला धरून भाष्य करा. नोकरीच्या कामात चूक होईल. चर्चेत वाद वाढेल. काळजी घ्या. धंद्यात हिशेब तपासा. भागीदारासोबत मतभेद होतील. मैत्रीच्या भावनेतून वर्तन ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा दबाव राहील.

शुभ दिनांक –  24, 25

वृषभ – अनाठायी खर्च टाळा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, बुध लाभयोग. प्रत्येक दिवस यशदायी मोह, व्यसन नको. गैरसमज टाळा. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात चर्चेत यश मिळेल. नवे काम मिळेल. वाद करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिलासा देणारी, प्रतिष्ठा वाढवणारी बातमी मिळेल. जवळच्या व्यक्ती नाराज होण्याचा संभव. नविन परिचय नीट तपासा. अनाठायी खर्च टाळा.

शुभ दिनांक – 25, 26

मिथुन – विचारपूर्वक निर्णय घ्या

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, चंद्र, बुध लाभयोग. संमिश्र स्वरूपाच्या घटना तुमच्या क्षेत्रात घडतील. महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. ओळख उपयुक्त ठरेल. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळवाल. नोकरीत व्याप वाढला तरी प्रशंसा होईल. धंद्यात वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणतेही वक्तव्य करण्याची घाई नको. विचारपूर्वक निर्णय घ्या.

शुभ दिनांक – 27, 28

कर्क – नोकरीत वर्चस्व राहील

चंद्र, गुरू युती, सूर्य, चंद्र लाभयोग. कोणताही कठीण प्रश्न रेंगाळत ठेवू नका. तारतम्य ठेवा. समस्या सोडवता येतील. अनेकांचे सहकार्य मिळवाल. नोकरीत वर्चस्व राहील. कामाचे कौशल्य दिसेल. तत्परता ठेवा. धंद्यात वाढ होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे कौतुकास्पद व उपयुक्त ठरतील. डावपेच यशस्वी होतील.

शुभ दिनांक – 22, 23

सिंह – योजना पूर्ण कराल

बुध, हर्षल त्रिकोणयोग, चंद्र, गुरू युती. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची, कठीण कामे करून घ्या. विचारांना चालना देणारे प्रसंग घडतील. अनेकांचे सहकार्य आत्मविश्वास वाढवणारे असेल. नोकरीत चांगला बदल घडेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील योजना पूर्ण कराल. प्रतिष्ठा मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात पुढे राहाल.

शुभ दिनांक – 23, 25

कन्या – कामे मार्गी लागतील

बुध, हर्षल त्रिकोणयोग, चंद्र, गुरू युती. अनेक दिवसांपासून रेंगाळलेले काम मार्गी लावता येईल. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. नवीन परिचय फायदेशीर होतील. कला, क्रीडा, साहित्यात यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचारांना चालना देणारे प्रसंग घडतील. तुमचा प्रभाव, लोकप्रियता वाढेल. नोकरीत बढती होईल.

शुभ दिनांक – 25, 26

तूळ – कायद्याला धरून बोला

चंद्र, मंगळ युती, शुक्र, प्लुटो केंद्रयोग. कोणताही प्रश्न लगेच सोडवता येईल या भ्रमात राहू नका. कायद्याला धरून वक्तव्य महत्त्वाचे आहे. सहनशीलता, नम्रता यावरच यश मिळवावे लागेल. कुठेही जास्त अपेक्षा ठेवू नका. प्रेमाने वागा परंतु वाहवत जाऊ नका. योग्य व्यक्तीला सल्ला घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव, वाद, चिंता जाणवतील.

शुभ दिनांक – 25, 26

वृश्चिक – तणाव, वाद टाळा

बुध, हर्षल त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र लाभयोग. क्षुल्लक तणाव, वाद टाळल्यास यश मिळवता येईल. जवळच्या व्यक्तींना नाराज करू नका. अनाठायी खर्च टाळा. नोकरीधंद्यात इतरांना मदत करावी लागेल. वरिष्ठांची मर्जी राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात फसगत टाळा. तुमचा मुद्दा विचारपूर्वक असेल. भावनेच्या आहारी जाऊ नका.

शुभ दिनांक – 27, 28

धनु – दगदग वाढेल

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ युती. क्षेत्र कोणतेही असो दगदग, धावपळ वाढेल. अनेक विचारांच्या व्यक्तींना सांभाळून घेत तारेवरची कसरत करावी लागेल. तिढा सोडवणे कठीण. नोकरीत इतरांना मदत करण्यात वेळ जाईल. मनावर ताण येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या विचारानुसार वागावे लागेल. वादाचे प्रसंग वारंवार समोर येतील.

शुभ दिनांक – 24, 25

मकर – प्रवासात सावध रहा

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र लाभयोग. रागावर नियंत्रण ठेवा. अनेक प्रश्न मार्गी लावता येतील. दिग्गज व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. प्रगतीकारक वातावरण राहील. नोकरीधंद्यात अडचणी येतील. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढेल. अनेकांना मदत करताना स्वतचे स्थान मजबूत करा. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल.

शुभ दिनांक – 27, 28

कुंभ – काळजीपूर्वक मत मांडा

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ युती. समस्या सोडवणे कठीण वाटेल. अनेक बाजूंनी विचार करूनही अडचण कशी दूर करावी हा प्रश्न अनुत्तरित राहतो. अडचणीत याल असे कोणतेही वक्तव्य टाळा. दबाव, तणाव राहील. नोकरी टिकवा. धंद्यात नम्र रहा. लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा दबाव नकोसा वाटेल. काळजीपूर्वक मत मांडा.

शुभ दिनांक – 24, 25

मीन – गैरसमज दूर ठेवा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध, नेपच्युन प्रतियुती. रेंगाळलेली कामे होतील. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. कोणतेही काम करताना भावनेच्या आहारी जाऊ नका. नोकरीधंद्यात वाढ होईल. भागीदाराला कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज वाढू देऊ नका. सहकारी नेतेमंडळींना सांभाळून घ्या. अनाठायी खर्च नको.

शुभ दिनांक – 27, 28