साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ऑगस्ट ते शनिवार 17 ऑगस्ट 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – गैरसमज होतील

मेषेच्या पंचमेषात सूर्य, मंगळ, गुरू प्रतियुती. आर्थिक व्यवहारात तणाव झाला तरी प्रश्न सोडवता येतील. नोकरीच्या ठिकाणी गैरसमज होतील. धंद्यात कायद्याला धरूनच निर्णय घ्या. चर्चेतून मार्ग शोधता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तारेवरची कसरत होईल. जवळच्या व्यक्ती, सहकारी साहाय्य करतील.

शुभ दिनांक : 16, 17

वृषभ – रागावर ताबा ठेवा

वृषभेच्या सुखस्थानात सूर्य, चंद्र, गुरू प्रतियुती. क्षेत्र कोणतेही असो अडचणीतून जावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात घाई नको. रागावर ताबा ठेवा. नोकरीत व्याप होतील. धंद्यात खर्च होईल. धावपळ करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता दाखवावी लागेल. वरिष्ठांची मर्जी पाहून मत व्यक्त करा. घरगुती कामे वाढतील.

शुभ दिनांक : 13, 14

मिथुन – वेगावर नियंत्रण ठेवा

मिथुनेच्या पराक्रमात सूर्य, चंद्र, शुक्र लाभयोग. तडजोड, मिळतेजुळते धोरण ठेवल्यास अनेक कामे करून घेता येतील. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नोकरीच्या कामात सहनशीलता ठेवल्यास यश मिळेल. धंद्यात तेजी राहील. वसुली शक्य. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांची भेट, चर्चा होतील. यात महत्त्वाचे मुद्दे मांडता येतील.

शुभ दिनांक : 11, 12

कर्क – योग्य निर्णय घ्याल

कर्केच्या धनेषात सूर्य, मंगळ, गुरू युती. वादाला महत्त्व देऊ नका. योग्य हिताचा निर्णय घ्याल. नोकरीत प्रगतीची संधी लाभेल. कौतुक होईल. धंद्यातील समस्या सोडवाल. कर्जाच्या कामाला गती मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य, मान-सन्मान, कठीण कामे करता येतील. सर्वांच्या मताचा आदर करून निर्णय घ्या.

शुभ दिनांक : 13, 14

सिंह – वरिष्ठांची मर्जी राखा

स्वराशीत सूर्य, मंगळ, गुरू युती. तारेवरची कसरत करूनच निर्णय घ्यावे लागतील. अपमानकारक प्रसंग चतुराईने निभावून न्यावे लागतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. धंद्यात नम्रता ठेवल्यास लाभ वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध रहा. विरोधकांना कमी लेखू नका. स्वतच्या कार्याचा विस्तार करण्यावर भर द्या.

शुभ दिनांक : 16, 17

कन्या – कामात चूक टाळा

कन्येच्या व्ययेषात सूर्य, चंद्र, गुरू प्रतियुती. सप्ताहाच्या सुरूवातीला कामे करा. नोकरीत कामे वाढतील. वरिष्ठांची नाराजी राहील. कामात चूक टाळा. धंद्यात फसगत होईल. मोह नको. महत्त्वाची वस्तू सांभाळा. नात्यात, मैत्रीत गैरसमज होतील. तणाव, खर्च जाणवेल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे खोडून काढावे लागतील.

शुभ दिनांक : 11, 12

तूळ – प्रत्येक दिवस यशदायी

तुळेच्या एकादशेत सूर्य, चंद्र, बुध लाभयोग. प्रत्येक दिवस यशदायी ठरेल. आळस नको. मेहनत घ्या. तत्परता ठेवा म्हणजे प्रगती होईल. रागाचा पारा नियंत्रणात ठेवल्यास यश खेचता येईल. व्यावहारिक कामे करून घ्या. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात धोका पत्करू नका. चर्चेतून यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व राहील.

शुभ दिनांक : 13, 14

वृश्चिक – नोकरीत महत्त्व वाढेल

वृश्चिकेच्या दशमेषात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोणयोग. कठीण, किचकट कामे करून घ्या. गोड बोलून समस्या सोडवा. तिरस्कार करू नका. नोकरीत महत्त्व वाढेल. धंद्यात सुधारणा होईल. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे अंदाज बरोबर ठरतील. सहकारी, नेते यांना आटोक्यात ठेवाल. तुम्हाला अनेकांचा पाठिंबा मिळेल.

शुभ दिनांक : 15, 16

धनु – कायदा पाळा

धनुच्या भाग्येषात सूर्य, चंद्र, शुक्र लाभयोग. कौशल्य, चातुर्य पणाला लावून  यश खेचावे लागेल. कुणालाही कमी समजू नका. कायदा पाळा. विरोधकांना आपलेसे करणारे मुद्दे शोधता येतील. नोकरीत प्रभाव वाढेल.  कौतुक होईल. धंद्यात तेजी येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्रीची भाषा करतील. नवे डावपेच टाकून इतरांना चकित कराल.

शुभ दिनांक : 16, 17

मकर – कराराची घाई नको

मकरेच्या अष्टमात सूर्य, मंगळ, गुरू युती. क्षेत्र कोणतेही असो भावनेच्या आहारी न जाता, मोहाला बळी न पडता निर्णय घ्या. कृती करा. तात्पुरता मोठेपणा देऊन स्वार्थ साधणारे लोक ओळखा. कराराची घाई नको. उतावळेपणा कुठेही करू नका. नोकरीधंदा टिकवा. मोह, व्यसन नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेचांचे गणित लक्षात ठेवा.

शुभ दिनांक : 11, 12

कुंभ – जुने येणे वसूल करा

कुंभेच्या सप्तमेषात सूर्य, चंद्र, बुध लाभयोग. प्रत्येक दिवस उत्साह वाढवणारा ठरेल. संताप न वाढवता कामे करण्यावर भर द्या. अनेकांचे सहकार्य लाभेल. नोकरीतील समस्या सोडवाल. प्रभाव वाढेल. धंद्यात लाभ होईल. जुने येणे वसूल करा. सुधारणा करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थोरामोठय़ांचे स़हकार्य घेऊन समस्यांवर जिद्दीने मात कराल.

शुभ दिनांक : 16, 17

मीन – वक्तव्ये जपून करा

मीनेच्या षष्ठेषात सूर्य, बुध नेपच्यून षडाष्टक योग. सहनशीलता, नम्रता ठेऊन कामावर लक्ष केंद्रित करा. क्षेत्र कोणतेही असो वक्तव्ये जपून करा. कायदा पाळा. नोकरीच्या कामात चूक होईल. वाद, तणाव वाढेल. व्यवहारात फसगत होईल. समस्या वाढणार नाही याची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर परिस्थितीचा अभ्यास करा. धावपळ वाढेल.

शुभ दिनांक :  11, 14