साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 1 सप्टेंबर ते शनिवार 7 सप्टेंबर 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – चतुराईने वागा

मेषेच्या पंचमेषात बुध, चंद्र मंगळ लाभयोग. जवळच्या व्यक्ती नाराज होतील. काळजी घ्या. विरोधक गुप्त कारवाया करतील. मोह, व्यसन नको. नोकरीत कर्तृत्व दाखवाल. सहकारी द्वेष करतील. धंद्यात नुकसान टाळा. चतुराईने वागा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी मुद्दे तयार करून सर्वांना चकित कराल. मान, प्रतिष्ठा वाढेल.

शुभ दिनांक – 2, 7

वृषभ – नम्रता व संयम राखा

वृषभेच्या सुखस्थानात बुध, चंद्र, शुक्र युती. सार्वजनिक कार्यात पुढे राहाल. तुमच्या क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रसंगानुरूप उत्तरे द्या. नम्रता व संयम राखा. वरिष्ठांना मदत करावी लागेल. कार्याचा आढवा घेऊन तत्परता दाखवावी लागेल.

शुभ दिनांक – 4, 5

मिथुन – आग्रही भूमिका दूर ठेवा

मिथुनेच्या पराक्रमात बुध, मंगळ प्लुटो षडाष्टक योग. सहनशीलता ठेवा. यश मिळवता येईल. सार्वजनिक कामात सावध राहा. नोकरीत हुशारी दाखवाल. धंद्यात वाढ होईल. आग्रही भूमिका नको. वसुली करा. कर्जाचे काम करा. कोणतेही कठीण काम रेंगाळत ठेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनाप्रमाणे संधी घेता येईल. प्रतिष्ठा राहील.

शुभ दिनांक – 1, 7

कर्क – प्रवासात घाई नको

कर्केच्या धनेषात बुध, चंद्र शुक्र युती. प्रत्येक दिवस उत्साह, आत्मविश्वास वाढवणारा आहे. प्रवासात घाई नको. नोकरीत मोठी संधी, बदल घडेल. धंद्यात नवे धोरण लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनाप्रमाणे कार्यरचना कराल. अनेकांचे सहकार्य मिळेल. पद, प्रतिष्ठा लाभेल. रागाचा पारा कुठेही वाढवू नका. कौटुंबिक वाटाघाटीत यश मिळेल.

शुभ दिनांक – 4, 5

सिंह – कामे मार्गी लागतील

स्वराशीत बुध, चंद्र शुक्र युती. तुमच्या क्षेत्रात अग्रेसर राहाल. कोणत्याही कामाची सुरूवात करू शकाल. अनेक कठीण कामे मार्गी लागतील. नोकरी लागेल. परदेशात जाण्याचा योग येईल. धंद्यात उलाढाल यशस्वी होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीपथावर वाटचाल होईल. लोकप्रियता, सन्मान मिळेल.

शुभ दिनांक – 6, 7

कन्या – धंद्यात अरेरावी नको

कन्येच्या व्ययेषात बुध, चंद्र गुरू त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो धावपळ वाढेल. नम्रता ठेवा. कायद्याच्या कक्षेत राहून वक्तव्य करा. तणाव वाढेल. दूरदृष्टी ठेवा. नोकरी टिकवा. मधुरवाणी ठेवा. धंद्यात अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात माघार घ्यावी लागेल. वरिष्ठांचा दबाव राहील. लोकांचे सहकार्य मिळेल. स्पर्धा कठीण आहे.

शुभ दिनांक – 6, 7

तूळ – नुकसान टाळता येईल

तुळेच्या एकादशात बुध, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. क्षुल्लक वाद, गैरसमज होतील. अनाठायी खर्च होतील. मन अस्थिर राहील. नोकरीच्या कामात यश मिळेल. धंद्यात नुकसान टाळता येईल. मोह, व्यसन नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनातील भावना व्यक्त करताना काळजी घ्या. तुमच्याबद्दल नाराजी पसरवली जाईल.

शुभ दिनांक – 1, 7

वृश्चिक – धंद्यात प्रगती साधाल

वृश्चिकेच्या दशमेषात बुध, चंद्र शुक्र युती. अनेक कामांना गतिमान कराल. महत्त्वाची कामे सप्ताहाच्या सुरूवातीला करून घ्या. नोकरीच्या कामात वरिष्ठांना खुश कराल. धंद्यात नवा विचार यशस्वी ठरेल. प्रवासात सावध रहा. दुखापत टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित कराल. नवे डावपेच लोकप्रियता देतील.

शुभ दिनांक – 4, 5

धनु – समस्या सोडवाल

धनुच्या भाग्येषात बुध, चंद्र शुक्र युती. प्रत्येक दिवस सत्कारणी लावा. दिशादर्शक कालावधी. थोरामोठय़ांच्या सहकार्याने कठीण समस्या सोडवाल. खरेदीविक्रीत लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी वर्चस्व लाभेल. धंद्यात क्षुल्लक वाद वाढवू नका. वसुली शक्य. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक समस्या सोडवाव्या लागतील. वरिष्ठ नेते, सहकारी मदत करतील.

शुभ दिनांक – 6, 7

मकर – अहंकार नको

मकरेच्या अष्टमेषात बुध, चंद्र, शुक्र युती. तणाव, वाद यावर मात करून यश मिळवावे लागेल. अहंकाराची भाषा प्रतिमा डागाळेल. कायद्याच्या चौकटीत राहून मुद्दे मांडा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दौऱ्यात काळजी घ्या. तटस्थ भूमिका घेणे योग्य ठरेल. कोर्टकचेरीच्या कामात चिंता जाणवेल. प्रयत्नांनी यश मिळेल. नम्रता ठेवा.

शुभ दिनांक – 6, 7

कुंभ – अनाठायी खर्च टाळा

कुंभेच्या सप्तमेषात बुध, मंगळ, प्लुटो षडाष्टक योग. जवळच्या व्यक्तींना न दुखावता बोला. गैरसमज वाढवू देऊ नका. अनाठायी खर्च टाळा. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात नम्रता ठेवा. हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टीका करताना सावध रहा. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. प्रतिष्ठा राहील. सहकारी, नेते यांचे ऐकावे लागेल.

शुभ दिनांक – 2, 7

मीन –  नोकरीत व्याप राहील

मीनेच्या षष्ठेशात बुध, चंद्र, शुक्र युती. कोणत्याही क्षेत्रात काम करताना अतिशयोक्ती, आग्रह, अहंकार ठेवू नका. प्रेमाने समस्या सोडवा. थोरामोठय़ांचा अपमान करू नका. नोकरीत व्याप, चिंता राहील. धंद्यात लाभ होईल. सहनशीलता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचे मत ग्राह्य धरावे लागेल. चौफेर दबाव राहील. गणेश उत्सवात कामे वाढतील.

शुभ दिनांक –  4, 5