आधारकार्ड नव्हे, ही तर लग्नपत्रिका

आपला लग्नसोहळा संस्मरणीय व्हावा यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. अशीच एक लग्नपत्रिका सध्या व्हायरल होतेय. अगदी हुबेहूब आधारकार्डसारखीच. ज्यांच्या घरी ही लग्नपत्रिका पाठवण्यात आली, त्यांना काही क्षण घरी आधारकार्ड आल्यासारखे वाटले. पण काही मिनिटांतच हे आधारकार्ड नसून लग्नपत्रिका असल्याचे स्पष्ट झाले. वराचे नाव प्रल्हाद, तर वधूचे नाव वर्षा आहे. आधारकार्ड क्रमांकाच्या जागी त्यांनी लग्नाची तारीख लिहिली आहे. तसेच वधू-वराचा फोटो आहे.