
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढलं आहे. यातच आता पुढील चार ते पाच दिवसात राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत सुद्धा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय सोमवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिठीची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अदाजानुसार, सोमवारपासून पुढील 4-5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाऊस व सोसाट्याचे वाऱ्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटची शक्यता. 31 मार्च रोजी ठाणे पालघर नाशिक नगर धुळे नंदुरबार सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. तर 1 एप्रिल रोजी ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक, नगर जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे.