राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत महायुतीचे सरकार आल्यानंतर गुंडगिरी सर्वत्र फोफोवलेली दिसत आहे. बीड येथील मस्साजोग आणि परभणीतील प्रकरणाने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तरीही सरकारकडून आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात मकरासंक्राती सणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या एक्सवर आपल्याला महाराष्ट्रहिताचा तिळगूळ वाटावाच लागेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रावर संक्रांत आलीय का? असा सवाल या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. ही संक्रांत महाराष्ट्रद्रोही वृत्तीची आहे! ह्या वृत्तीला ‘खो’ द्यावाच लागेल. ‘महाराष्ट्रहिताचा तिळगुळ’ आपल्याला वाटावाच लागेल! असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.गृहखात्याच्या निक्रियतेमुळे गुंडशाहीला मोकळे रान मिळालंय. सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश आलंय. सरकारचे बळीराजाकडे दुर्लक्ष होत आहे. सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत असून कुठे गेले अच्छे दिन असा सवालही ट्विटमध्ये करण्यात आला आहे.
महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रावर संक्रांत आलीय का?
ही संक्रांत महाराष्ट्रद्रोही वृत्तीची आहे! ह्या वृत्तीला ‘खो’ द्यावाच लागेल. ‘महाराष्ट्रहिताचा तिळगुळ’ आपल्याला वाटावाच लागेल! pic.twitter.com/MUDPAg7ee6— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 14, 2025
महाराष्ट्रात मराठी बांधवच असुरक्षित असून मराठी अस्मितेचा कणा वाकतोय का, असा सवाल करण्यात आला आहे. महाराष्ट्राची लूट सुरू असून महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा डाव नाही ना, असेही विचारण्यात आले आहे. ही संक्रांत महाराष्ट्रद्रोही वृत्तीची आहे! ह्या वृत्तीला ‘खो’ द्यावाच लागेल. ‘महाराष्ट्रहिताचा तिळगुळ’ आपल्याला वाटावाच लागेल! असा निर्धार या ट्विटद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.