महाराष्ट्रात मराठी माणसांनी काय खायचे हे आम्हीच ठरवणार! गिरगावकरांनी ठणकावले

मराठमोळय़ा गिरणगावच्या टोलेजंग विकासासोबतच मांसाहारी आणि शाकाहारी अशा भिंती उभ्या राहत आहेत. अनेक सोसायटय़ांमध्ये मांसाहाराला मनाई करण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यावरून अनेकदा खटकेही उडत आहेत. या पार्श्वभूमीवर गिरगावात शोभायात्रेवेळी झळकलेला हा फलक लक्षवेधी ठरला. ‘आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी ताटात काय खायचे हे फक्त आम्हीच ठरवणार’ असे यात ठणकावून सांगण्यात आले. ‘आम्ही गिरगावकर’ या संस्थेने हा फलक लावला आहे.