सहा वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्के भरली मोठी धरणे

राज्यातील मोठी धरणे 2018नंतर तब्बल सहा वर्षांनी यंदा प्रथमच 100 टक्के भरली आहेत. उजनी, कोयना, जायकवाडी, त्याचप्रमाणे भातसा आणि वैतरणा ही धरणे 100 टक्क्यांच्या आसपास भरल्याची माहिती जलसंपदा विभागाने आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली. गेल्या वर्षी याच सुमारास सुमारे 65 टक्के पाणीसाठा या धरणांमध्ये होता.

राज्यात 102 टक्के पेरण्या

राज्यात सरासरीच्या 121 टक्के पाऊस झाला असून 102 टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली. गेल्या वर्षी याच सुमारास सरासरीच्या 81.4 टक्के पाऊस झाला होता. 1 जून ते 2 सप्टेंबरपर्यंत 1002 मि.मी. पाऊस झाला आहे.

राज्यात खरीपाचे 142.02 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 144.92 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 102 टक्के पेरण्या झाल्या आहेत. केवळ पाच तालुक्यांत 50 ते 75 टक्के पाऊस झाला असून 305 तालुक्यांत 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, असे सांगण्यात आले.