पाणीप्रश्न कायम : फडणवीस यांनी केली फसवणूक, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा आरोप

महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर पुढील ६ महिन्यांमध्ये शहरवासीयांना पाणी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. आज रोजी अशी परिस्थिती आहे की, शहरातील 18 वॉर्डामध्ये मागील 25 दिवसांपासून पाणी आलेले नाही. छत्रपती संभाजीनगरवासीयांची देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केली, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा व शहरातील पाणीप्रश्नांसाठी मध्य विधानसभा मतदारसंघातील गुलमंडी राजाबाजार येथील जागृत सभागृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मराठी नववर्ष शिवसेनेच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात साजरे करा. गुढीपाडव्याची मिरवणूक सर्व संभाजीनगर वासियांच्या स्मरणात कायम राहील अशा प्रकारे काढा. तसेच शहरात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून या समस्या विरोधात शिवसेनेच्या वतीने पुढील एक महिना दररोज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केले गेले पाहिजे अशी माझी भूमिका आहे. या आंदोलनातून महानगरपालिकेच्या समस्या मांडण्यात आल्या पाहिजे. हंडा मोर्चा, वेगवेगळ्या प्रकारचे होर्डिंग्ज आणि स्वाक्षरी मोहीम राबव राबवून पाण्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण केली गेली पाहिजे, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली.

याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, लक्ष्मीनारायण बखारिया, राजू इंगळे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, शहर संघटक सचिन तायडे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, माजी नगरसेवक राजेश उर्फ पप्पू व्यास, सिताराम सुरे, सचिन खैरे, सतिष कटकटे, राजेंद्र दानवे, संदेश कवडे, सुगंधकुमार गडवे, विनायक देशमूख, बंटी जैस्वाल, सुरेश पवार, मिथुन व्यास, महिला आघाडी जिल्हासंघटक आशा दातार, शहरसंघटक सुनिता सोनवणे, कविता सुरळे, प्रतिभा राजपूत, विजया पवार, रंजना कोलते, युवासेना सहसचिव अॅड. धर्मराज दानवे, गौरव पुरंदरे, प्रविण शिंदे, सचिन लकासे, सचिन ढोकरट, रणजित दाभाडे, योगेश पवार, रणजित दाभाडे, सुरेश व्यवहारे, संदीप हिरे, पंकज जोशी, प्रतीक अंकुश, महेश घोंगते आदी उपस्थित होते.