
छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना 40हून अधिक टँकरच्या माध्यमातून सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. अशी भयानक परिस्थिती जिल्ह्यात असताना छत्रपती संभाजीनगरचे महापालिका आयुक्त जी. श्रीकांत मुंबईत IPL बघण्यात गुंग झाले आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली आहे.
रोम जळत असताना निरो सारंगी (फिडेल) वाजवत होता. आणि शहरात पाणीबाणी माजलेली असताना छत्रपती संभाजीनगरचे महापालिका आयुक्त मुंबईत आयपीएल क्रिकेटचा सामना बघत होते.#Watercrisis #chhatrapatisambhajinagar pic.twitter.com/wpNt8x5tG0
— Ambadas Danve (@iambadasdanve) April 8, 2025
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणी टंचाईवरून महापालिका आयुक्तांचे कान टोचले आहेत. “रोम जळत असताना निरो सारंगी (फिडेल) वाजवत होता. आणि शहरात पाणीबाणी माजलेली असताना छत्रपती संभाजीनगरचे महापालिका आयुक्त मुंबईत आयपीएल क्रिकेटचा सामना बघत होते.” अशी टीका अंबादास दानवे यांनी पोस्टमधून केली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबईविरुद्ध बंगळुरू सामन्यात महापालिका आयुक्त सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे. परंतु, दुसरीकडे जिल्ह्यातील नागरिक भीषण पाणीटंचाईमुळे त्रस्त झाले आहेत.