काही लोक रोज रात्री झोपण्यापूर्वी सोशल मीडियावर छोटे व्हिडीओ किंवा रिल्स पाहतात. जे तरुण रात्री झोपण्याआधी रिल्स पाहतात त्यांना हायरटेन्शनचा अधिक त्रास होतो, असे संशोधनातून सिद्ध झालेय. अलीकडच्या एका संशोधनामध्ये झोपण्यापूर्वी व्हिडीओ पाहणे आणि आरोग्याचा थेट संबंध असल्याचे दिसून आलंय. चीनमधील अभ्यासात असं दिसून आलंय की, जे लोक झोपण्यापूर्वी रिल्स पाहण्यात अधिक वेळ घालवतात त्यांना उच्च रक्तदाब आणि हायपरटेन्शनचा अधिक त्रास असतो. ‘बीएमसी जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधन अहवालामध्ये एकूण 4 हजार 318 लोकांनी सहभाग घेतला. अभ्यासात झोपण्यापूर्वी रिल पाहण्यात किती वेळ खर्च केला जातो याबद्दलही माहिती देण्यात आलेय. बंगळुरूमधील कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर दीपक कृष्णमूर्ती यांनी या संशोधनामधील हा तपशील आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरून शेअर केला.