राजस्थान: पावसाचा तडाखा, हायव्होल्टेज विद्युत पोल धावत्या कारवर पडला

rasthan-rain-car-roof

राजस्थानच्या काही तालुक्यांना मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. काही ठिकाणी झाडं, विद्युत पोल पडल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. गंगानगरमध्ये मुसळधार पावसात हाय-व्होल्टेज पॉवर लाइनचा पोल चालत्या कारवर पडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मान्सूनच्या सक्रिय हजेरीमुळे राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

गेल्या 24 तासांत, पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस झाला, ढोलपूरमध्ये 124 मिमीची नोंद झाली. पश्चिम राजस्थानमध्ये जोधपूर, बिकानेर, उदयपूर, अजमेर, कोटा आणि जयपूर सारख्या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडला, तर नागौरमध्ये 45 मिमी पाऊस झाला.

या पावसामुळे तापमानात लक्षणीय बदल झाला, गंगानगर येथे सर्वाधिक 41.5 अंश आणि हनुमानगड सर्वात कमी 30.3 अंश तापमान नोंदवले गेले. राजस्थानमधील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कायम आहेत.