
पावसामुळे वर्धा शहरातील रस्त्यांची पोलखोल झाली आहे. वर्धा शहरात विविध चौकामध्ये मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. वर्धा नगरपरिषद प्रशासनाकडून झालेल्या रस्त्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे डांबर आणि सिमेंट वापरण्यात आल्याने ही अवस्था झाली आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ‘लाडका खड्डा योजना जाहीर करा’ असा टोला लगावत आंदोलन करण्यात आले.
वर्ध्याच्या वंजारी चौक आणि पावडे चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले आहे. वर्धा विधानसभाप्रमुख निहाल पांडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले. स्थानिक आमदार आणि जिल्हा प्रशासन त्यांच्या विरोधात घोषणा देत खड्ड्यात बसून आंदोलन केले गेले आंदोलनात मोठ्या संख्येत कार्यकर्ते व महिला देखील सहभागी झाल्या होत्या.