
>> चेतन वाघमारे, वर्धा
वर्धा नगरपालिका प्रशासनाला लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याच्या स्वच्छता करण्याचा विसर पडला आहे.
नेहमीच लोकमान्य टिळकांच्या पुतळा परिसरात घाणीचे साम्राज्य राहते. यामुळें आता नगरपालिकेच्या माध्यमातून टिळकांच्या पुतळ्यांसमोर घाण ठेवीत कुठला आदर्श जनतेला दिला जात आहे हा मोठा प्रश्न यातून निर्माण झाला आहे.
लोकमान्य टिळक पुतळा परिसरात स्वच्छता करण्याची नागरिकांकडून पालिका प्रशासनाला मागणी केली जाते आहे.
स्वच्छ शहर म्हणून वर्ध्याला पुरस्कार मिळाला आहे. परंतु वर्ध्यात स्वच्छता अभियानाचे तीन तेरा वाजले असून ही स्वच्छ्ता फक्त पुरस्कारापूर्तीच होती का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वर्धेत भाजपचे आमदार पंकज भोयर तर नगरपालिकेत देखील भाजपची सत्ता. यावेळी वर्धा स्वच्छ करण्याचा ध्यास जणू त्यांनी घेतला आहे असा आव आणला जात होता. मात्र अद्याप वर्ध्यातील गोल बाजार परिसरात असलेल्या लोकमान्य टिळक पुतळा परिसरातून कचरा देखील उचलायला नगरपालिका प्रशासनाला वेळ नाही. यामुळे ताबडतोब हा कचरा उचलून पुतळा परिसर स्वच्छ करावा अशी मागणी वर्धेतील नागरिक करत आहेत.