Waqf Board Amendment Bill 2025 – तुमचा हेतू जमीन हडपण्याचा, न्याय देण्याचा नाही; अरविंद सावंत यांनी सरकारला धरलं धारेवर

वक्फ सुधारणा विधेयकावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केंद्र सरकारला धारेवर धरले. बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांचं मुस्लिम प्रेम पाहून आश्चर्य वाटलं, असा टोला लगावत अरविंद सावंत यांनी सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केली आहे. ज्या प्रकारे सरकारने हे विधेयक आणले आहे ते पाहाता तुमचा हेतू स्पष्ट होत नाही. तुमच्या मनात काही वेगळचं आहे. तुम्हाला जमीन हडप करायची आहे, असा घणाघात अरविंद सावंत यांनी केला.

वक्फ सुधारणा विधेयकासाठी नेमलेल्या जेपीसीमध्ये (संसदेची संयुक्त समिती ) मीही होतो. दुर्दैवाने जेपीसीमध्ये शेवटपर्यंत तरतुदींवर चर्चा झाली नाही. ज्यांचा काहीही संबंध नाही अशांनाही जेपीसीमध्ये बोलावण्यात येत होतं. अशा स्थितीत तुम्ही विधेयक आणत असाल तर तुमचं उद्दिष्ट काय आहे? हे बघितल्यानंतर अनेकदा जाणवलं की तुमच्या कथनी आणि करणीत मोठा फरक आहे. विधेयक आणून कोणाला न्याय देण्याचं तुमच्या मनात नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काय बोलणार? हिंदुत्वासोबत उभं राहणार का? आता तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.

हा देश म्हणजे जेल नाही! संजय राऊतांचे राज्यसभेत तडाखेबंद भाषण

अलिकडेच पद्मनाभ मंदिरातील खजिना काढण्यात आला. तो खजिना का काढण्यात आला? त्यानंतर शंकराचार्य म्हणाले, केदारनाथ मंदिरातील तीनशे किलो सोनं गायब झालं? कसं गायब झालं? तिरुपतीकडेही तुमची नजर आहे? अयोध्येतही तुम्ही जे काही प्रयोग केले त्यामुळे जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली. तिथली मंदिरं तोडली, मूर्ती तोडल्या. वाराणसीतही तेच झाले. हे तुम्ही करताये हे योग्यच आहे, असं समजू नका. चैत्र सुरू झाल्यावर महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. त्यानंतर रमजान ईदही झाली. सौगात-ए-मोदी सुरू असल्याचं आम्ही बघितलं. आज सौगात-ए-वक्फ विधेयक आणलंय, असा टोला अरविंद सावंत यांनी हिंदुत्वाची भाषा करणाऱ्या भाजपला लगावला.

हे कसं विसरता तुम्ही? तुमचे मंगळसूत्र हिसकावले जातील, असे पंतप्रधान म्हणाले होते. यूपीचे मुख्यमंत्री म्हणाले होते, बटेंगे तो कटेंगे? कोण तुमच्यात फूट पाडणार होतं? आणि कोण तोडणार होतं? आता तुमचं मुस्लिम प्रेम उफाळून आलंय. हे प्रेम बघून आम्हालाही आश्चर्य वाटलं. पण बिहारची निवडणूक जवळ आलीय. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिमांनीही आपलं बलिदान दिलं आहे. त्यांनीही अंदमानमध्ये शिक्षा भोगली आहे. मात्र, हा न्यायाचा प्रश्न आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. विधेयकातही चुकीचं असेल तर आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. चुकीचं आहे ते दुरुस्त करा, असे अरविंद सावंत यांनी सुनावले.

वक्फ बोर्ड आधी निवडणूक घेत होतं. आता तुम्ही नेमणूक करणार आहात. तिथेच लोकशाहीला धोका आहे. नेमणूक करण्याचा मुद्दा येतो तेव्हा सरकारला जो पाहिजे त्याची नियुक्ती होईल. बाकी तर अधिकारी आहेत. अशी परिस्थिती होईल की बोर्डात मुस्लिम बांधवच अल्पसंख्येत येतील. जे दोन लोक गैर मुस्लिम तुम्हाला बोर्डात हवे आहेत त्याबद्दल आमच्या मनात शंक आहे. खरंच तुम्ही योग्य प्रकारे विधेयक आणलं आहे का? कारण बोर्ड आधी निवडणूक घेत होतं. आता तुम्ही नेमणूक करणार आहात. नेमणूक करणाऱ्यांमध्येही दोन गैर मुस्लिम असणार आहेत. त्यामुळे तुम्ही पूर्ण विचार करा, काय करताय ते? एकीकडे तुम्ही समान नागरी कायद्याची भाषा करता आणि दुसरीकडे दोन गैर मुस्लिम वक्फ बोर्डात आणता. मला भीती आहे, हिंदुंच्या मंदिरातही गैर हिंदू आणण्याचा प्रयत्न होईल. असं झालं तर शिवसेना त्याविरोधात उभी राहील. आम्ही त्याला विरोध करू. कारण हे जे काही करताय ते पुढे जाऊन ख्रिश्चनांसोबत होऊ शकतं, जैन धर्मातही होऊ शकतं, शिखांच्या गुरुद्वारातही होऊ शकतं. का करताय तुम्ही हे? काय आहे तुमचा हेतू? असा सवाल अरविंत सावंत यांनी केला.

काश्मीरमधून कलम 370 हटवले तेव्हा आम्ही तुमच्यासोबत होतो. आम्ही तुमचं अभिनंदन केलं. त्यानंतर किती हिंदू काश्मीरमध्ये आले? काश्मीरमध्ये जमीन कोण खरेदी करतंय तेही सांगा? देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी आहेत. त्या जमिनीही विकल्या जात आहेत. तुम्ही अशाच प्रकारचा कायदा हिंदूंच्या देवस्थनांच्या जमिनी विकणाऱ्यांविरोधात आणणार का? तेव्हाच खरं कळेल की धर्मनिरपेक्षतेवर बोलता की हिंदुत्वावर बोलता आणि मुस्लिमांबद्दल बोलतात, असे अरविंद सावंत म्हणाले.

Waqf Board Amendment Bill – वक्फच्या जमिनीपेक्षाही मोठा मुद्दा त्या जमिनीचा आहे ज्यावर चीनने आपली गावं वसवली आहेत, अखिलेश यादव यांनी लोकसभेत सरकारला घेरलं

ज्या प्रकारे सरकारने हे विधेयक आणले आहे ते पाहाता तुमचा हेतू स्पष्ट होत नाही. तुमच्या मनात काही वेगळचं आहे. तुम्हाला जमीन हडप करायची आहे. काश्मीरमध्ये, मणिपूरमध्येही तेच सुरू आहे. कोणत्या उद्योगपतींसाठी सुरू आहे हे सर्वांना माहिती आहे. तुमचा हेतू जमीन हडपण्याचा आहे बाकी काही नाही, न्याय देण्याचा नाही. ओठें पे सच्चाई रहती है जहा दिलमे सफाई रहती है, हम उस देश के वासी है जिस देश मे गंगा बहती है. तुमच्या ओठांवर खरं नाहीये आणि मनही साफ नाहीये. यामुळे राम तेरी गंगा मैली हुई, पापियों के पाप धोते धोते… असं म्हणावं लागलं. एक हजार लोकांचा मृत्यू झाला तिथे. तुम्ही बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला होता. आता तुम्ही काल सौगात-ए-मोदी दिलं. आता बाटोगे तो बचेंगे वाली बात आ गयी है. बचने के लिये बाट रहे हो. हे चुकीचं आहे. तुम्ही आपल्या मनाला विचारा खरंच तुम्हाला कुणाचं भलं करायचं आहे का? तुम्हाला भलं करायचं नाहीये. तुमच्या मनात जो द्वेष आहे ना तो काढून टाका. आम्हाला सौहार्द हवा आहे, द्वेष नाही. त्यामुळे या विधेयकातून खरंच मुस्लिमांना न्याय मिळेल का याचा फेरविचार करा, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी सरकारला फटकारले.