Waqf Amendment Bill 2025 – वक्फ विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर, 128 विरुद्ध 95 मते

वक्फच्या देशभरातील 9.4 लाख एकर जमिनीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाले आहे. वक्फ विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मते पडली.

दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी लोकसभेत मांडण्यात आले होते. लोकसभेतील बारा तासांच्या वादळी चर्चेनंतर रात्री 12 च्या ठोक्याला अखेर लोकसभेत मंजूर झाले होते. विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 सदस्यांनी मतदान केले.