महाकुंभासाठी विमानाने जायचेय, मोजा 50 हजार रुपये

महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांना विमानाच्या तिकिटासाठी 50 टक्के ते 300 टक्के अधिक पैसे मोजावे लागत आहेत. हैदराबाद, दिल्ली आणि मुंबईच्या तिकिटांची किंमत 47.5 हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. बोटी आणि तंबूमध्येही लोकांची फसवणूक होत असून कम्युनिटी प्लॅटफॉर्म लोकल सर्कलने 303 जिह्यांमधून कुंभमेळ्याला जाणाऱ्या 41 हजार लोकांच्या मुलाखती घेऊन सर्वेक्षण केले. यात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले.

अनेक विमान पंपन्यांनी भाडय़ापोटी 3 ते 6 पट भाडे घेतल्याचे अनेकांनी सांगितले. 2 फेब्रुवारीपर्यंत दिल्ली ते प्रयागराज विमान भाडे 40 हजार रुपयांवरून 15 हजार रुपये, परंतु पुन्हा 11 फेब्रुवारीपासून भाडे आणखी वाढले. महाकुंभाचा सोहळा संपण्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसे भाडे प्रचंड वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या चेन्नई ते प्रयागराजचे भाडे 53 हजार रुपये आहे. कोलकाता ते प्रयागराजदरम्यानच्या राऊंड-ट्रिपची किंमत 35 हजार रुपये आहे, तर हैदराबाद, दिल्ली आणि मुंबईच्या तिकिटांची किंमत 47.5 हजार रुपयांवर गेली आहे. दरम्यान, जास्त मागणीमुळे भाडे अधिक असल्याचे पेंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेत सांगितले.

62 टक्के पुरुष आणि 38 टक्के महिला

महाकुंभाला आलेल्या हिंदुस्थानातील 303 जिह्यांमधील लोकांनी सर्वेक्षणात भाग घेतला. त्याला 49 हजारांहून अधिक भाविकांनी प्रतिसाद दिला. 62 टक्के पुरुष, तर 38 टक्के महिलांनी उत्तरे दिली. त्यातील 44 टक्के भाविक मुंबई, दिल्ली, बंगळुरूसारख्या मोङ्गय़ा शहरांतील होते, तर 25 टक्के भाविक अहमदाबाद, जयपूर यांसारख्या शहरांमधून आणि 32 टक्के प्रतिसाद देणारे भाविक लहान शहरे व ग्रामीण जिह्यांमधील होते.

तीन रात्रींसाठी 2.4 लाख भाडे

प्रयागराजमधील लोकांसाठी उभारण्यात आलेल्या तंबू आणि बोटींचे भाडेही वाढले आहे. 29 जानेवारी रोजी मौनी अमावास्या आणि 3 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी यांसारख्या खास दिवशी भाडेवाढ सर्वाधिक होती. केवळ तीन रात्रीचे भाडे 2 लाख 4 हजार रुपये आकारण्यात येत आहे. मौनी अमावास्येच्या दिवशी तंबूत एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे 15 हजार रुपयांवरून 45 हजार रुपयांवर गेले. तर डोम सिटीमध्ये एका रात्रीचे भाडे 91 हजार रुपयांपर्यंत वाढले होते.