
हिंदुस्थानचा संघ तीन टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱयावर येणार आहे, मात्र त्यापूर्वीच अष्टपैलू वानिंदू हसरंगाने कर्णधारपद सोडल्याने श्रीलंका संघाला मोठा धक्का बसलाय. श्रीलंकन क्रिकेटच्या हितासाठी आपण हा निर्णय घेतला असून खेळाडू म्हणून आपण खेळत राहणार आहे, असेही हसरंगाने स्पष्ट केले. हिंदुस्थानी संघ श्रीलंका दौऱयावर पाल्लेकल येथे 26, 27 व 29 जुलैला टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर कोलंबोमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही वानिंदू हसरंगाचा राजीनामा स्वीकारला असून तो खेळाडू म्हणून यापुढेही संघातील महत्त्वाचा खेळाडू असेल, असेही बोर्डाने स्पष्ट केले. हसरंगा म्हणाला, एक खेळाडू म्हणून मैदानावर सर्वोत्तम योगदान देण्यात मी पुठलीच कसर सोडणार नाही. संघ व कर्णधार यांना माझे समर्थन असेल. मी त्यांच्या पाठीशी असेन.