बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी संबंधित खंडणीप्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड अखेर मंगळवारी दुपारी पुण्यात सीआयडी मुख्यालयात शरण आला. वाल्मीक कराडची सध्या सीआयडी चौकशी सुरू आहे. दरम्यान वाल्मीक कराडने त्याला पूर्णवेळ मदतनीस मिळावा म्हणून केज न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ‘आपल्याला स्लिप अॅप्निया हा आजार असून या आजारात झोपताना ऑटो सीपॅप ही मशून लावली जाते, असे त्याने या याचिकेत म्हटले आहे.
वाल्मीक वाल्मीक कराडने आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे, सीआयडी कोठडीमध्ये 24 तास मदतनीस मिळावा अशी मागणी वाल्मीक कराडने न्यायालयाकडे केली आहे.
वाल्मीक असलेल्या बीडच्या पोलीस स्थानकात 5 नवीन पलंग मागवण्यात आल्याची चर्चा सध्या रंगली आहे. महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी एक्स (ट्विटर) वरून केला.
वाल्मीक कराड वर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराड वर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवा