मारुती सुझुकीने आपले सर्वात अॅडव्हान्स Z सिरीज इंजिन पहिल्यांदा स्विफ्टमध्ये आणि नंतर Dezire मध्ये सादर केले होते. आता कंपनी हे इंजिन आपल्या सर्वात लोकप्रिय कार Wagon-R मध्ये समाविष्ट करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नवीन वॅगन-आर 17 जानेवारी रोजी होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाऊ शकते. मात्र अद्याप यासंदर्भात कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. असं बोललं जात आहे की, या कारमध्ये कॉस्मेटिक बदल पाहायला मिळू शकतात.
नवीन अवतारात येईल वैगन-आर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती नवीन वॅगन-आरला पूर्णपणे अपडेट करणार आहे, कारण खूप काळ या कारला कोणत्याही मोठ्या अपडेट्स मिळालेले नाहीत. डिझाइनपासून इंटीरियर्सपर्यंत अनेक नव्या फीचर्स आणि सुधारणा यात दिसू शकतात. सध्याच्या वॅगन-आरची एक्स-शोरूम किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होते. नवीन फीचर्स समाविष्ट केल्यानंतर याची किंमत वाढू शकते.
मिळणार नवीन इंजिन
सध्याच्या वॅगन-आरमध्ये 1.0L आणि 1.2L इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. नवीन वॅगन-आरमध्ये Z सीरीजचे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे नवीन इंजिन 80 ते 82 PS पॉवर आणि 110 ते 112 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. या इंजिनला 5-मॅन्युअल आणि 5-ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडले जाईल. नवीन इंजिन वजनाने हलके आणि पॉवरफुल आहे. यामध्ये चांगली मायलेज मिळते. नवीन इंजिनसह, या कारची मायलेज 23-24 kmpl पर्यंत जाऊ शकते. तसेच या कारमध्ये CNG चा पर्याय देखील मिळू शकतो.
सेफ्टी फीचर्स
नवीन वॅगन-आरमध्ये 6 एअरबॅग्स, एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD, ब्रेक असिस्ट, 3 पॉइंट सीट बेल्ट अशा अनेक सेफ्टी फीचर्सचा समावेश केला जाऊ शकतो.